China Faces Travel Ban: चीनवर प्रवास बंदी घालण्याची तयारी? अमेरिकेत मुलांमध्ये श्वासोच्छवासाचे आजार पसरल्यानंतर करण्यात आली मागणी
Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

China Faces Travel Ban: चीनमध्ये मुलांमध्ये श्वसनाचा आजार (Respiratory Disease) आणि न्यूमोनिया (Pneumonia) पसरत आहे. याबाबत जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. आता अमेरिकेच्या (America) पाच खासदारांनी चीनवर प्रवासी बंदी (Travel Ban On China) घालण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन खासदार मार्को रुबियो यांच्या नेतृत्वाखाली पाच खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

अमेरिकन खासदारांनी राष्ट्रपतींना लिहिले पत्र -

या पत्रात खासदारांनी या नवीन आजाराच्या धोक्यांविषयी अधिक माहिती मिळेपर्यंत अमेरिका आणि चीनदरम्यानच्या प्रवासावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनला मुलांमध्ये पसरणाऱ्या या नवीन रहस्यमय आजाराबाबत अधिक माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा -Mysterious Pneumonia Outbreak in China: चीनमध्ये रहस्यमय न्यूमोनिया आजाराचा उद्रेक; लहान मुलांमध्ये कमालीचे संक्रमण)

तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की चीनमध्ये नवीन रहस्यमय रोग कोरोना महामारीच्या सुरुवातीला दिसला होता. तसेच, संसर्ग झालेल्यांमध्ये कोणताही नवीन किंवा असामान्य विषाणू किंवा जीवाणू आढळले नाहीत.

तैवान सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्व -

दरम्यान, तैवान सरकारने गुरुवारी वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांना चीनचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. तैवान सरकारने म्हटले आहे की जर प्रवास करणे आवश्यक असेल तर प्रथम फ्लू आणि कोरोनाची लस घेतल्यानंतरच चीनला जा. (वाचा - Fact Check: कबुतरामुळे होतो 'Hyper Sensitive Pneumonia' आजार? पनवेल शहर महानगरपालिकेचे 'ते' परिपत्रक खोटे; जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, कोरोना महामारीतून अजूनही सावरत असलेल्या चीनमध्ये आणखी एका रहस्यमय आजारामुळे मोठ्या प्रमाणात मुले आजारी पडत आहेत. चीनच्या बीजिंग आणि लिओनिंग प्रांतातील मोठ्या संख्येने मुलांना या रहस्यमय न्यूमोनियाचा त्रास झाला. त्यामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या आजारात मुलांना ताप आणि फुफ्फुसाचा संसर्ग होत आहे.