Fake PCMC Circular of Pigeons Causing 'Hyper Sensitive Pneumonia'

सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या काळात सरकार अनेक बाबतीत मोठी लढाई देत आहे. नागरिक, इतर अधिकारी, अनेक संस्था, डॉक्टर्स, पोलीस असे अनेकजण या लढाईमध्ये उतरले आहेत. अशात सोशल मिडियावर अनेक वावड्या उठत आहेत, खोट्या बातम्या (Fack News) प्रसारित करून नागरिकांना अजून घाबरवले जात आहे. सध्या असेच एक परिपत्रक महाराष्ट्राच्या पनवेल (Panvel) भागात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, कबूतरामुळे (Pigeon) 'हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया' (Hyper Sensitive Pneumonia) आजार होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, हे परिपत्रक पनवेल शहर महानगरपालिकेचे असल्याचे भासवले जात आहे.

हे परिपत्रक व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केले असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता असे सत्य समोर आले आहे की, सोशल मीडियावर शेअर केले जाणारे हेच परिपत्रक गेल्या वर्षी इंटरनेटवर व्हायरल झाले होते. मार्च 2019 मध्ये सर्वप्रथम हे परिपत्रक दिसले होते. यामध्ये म्हटले आहे की, ‘कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूमुळे 'हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया' आजार होऊ शकतो, तरी कबुतरांना उघड्यावर खाणे देणे बंद करा.’ त्यावेळी पीसीएमसीचे आयुक्त (PCMC Commissioner) गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते की, पालिकेने असे कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. (हेही वाचा: Fact Check: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलली? या व्हायरल वृत्ताबाबत PIB ने केला खुलासा, जाणून घ्या सत्य)

कबुतरांच्या विष्ठेमुळे परिसर घाण होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, पीसीएमसीने कबुतरांना खायला घालण्याविरोधात नोटीस बजावली आहे. दरम्यान, व्हेनिसमधील 2008 च्या एका अभ्यासात असे आढळले की, एका वर्षात कबुतरे 25 पौंडहून अ धिक विष्ठा उत्पादित करू शकतात. त्यांचे पंख आणि विष्ठेमुळे 60 पेक्षा जास्त प्रकारच्या श्वसनाचे आजार उद्भवू शकतात.