खा. संजय राऊत यांची पोस्टर्स पाकिस्तानमध्ये झळकली; शिवसेनेच्या 'या' भूमिकेला दर्शवला पाठींबा
इम्रान खान, संजय राऊत यांचे पोस्टर आणि उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

मोदी सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेत कलम 370 आणि 35 A हटवले. यामुळे आता काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा न राहता जम्मू काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश बनले आहे. केंद्र सरकार या निर्णयाचे अनेकांनी समर्थन केले. सरकारने घेतलेला एक उत्तम निर्णय म्हणत त्याची तारीफही केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेत भाषण केले होते. हे भाषण प्रचंड गाजले होते, पाकिस्ताननेही याची दाखल घेत या भाषणाला पाठींबा दर्शवला आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाले आहेत.

‘जम्मू-कश्मीरातून कलम 370 चा कलंक हटविला आहे. आता पाकव्याप्त कश्मीर आणि बलुचिस्तान ताब्यात घ्या’ अशा शब्दांतील या भाषणाची चर्चा देश पातळीवर झाली होती. भारतातील तमाम माध्यमांनी याची दखल घेतली असताना, आता पाकिस्तानी माध्यमांनीही याची दखल घेतली आहे. संजय राऊत यांच्या पाक व्याप्त काश्मीर परत घेण्याच्या मुद्द्यावर एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने ट्विट केले होते. तेच ट्विट, मजकूर आणि संजय राऊत यांचा फोटो पाकिस्तानमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर दिसत आहे. (हेही वाचा: जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर शिवसेनेने व्यक्त केला आनंद; आज देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला - उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया)

राजधानीत इस्लामाबाद (Islamabad) येथील प्रेस क्लब एफ-6 या मुख्य रस्त्यावरील प्रत्येक विजेच्या खांबावर ही पोस्टर्स दिसत आहेत. 'महाभारत-अ-स्टेप फॉरवर्ड' असा मथळा याच्यासाठी देण्यात आला आहे. या पोस्टर्समुळे पाकिस्ताननेमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे, तर अनेक नागरिकांनी इम्रान खान यांनी याच्यातून काही बोध घ्यावा असे सूचित केले आहे.