जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर शिवसेनेने व्यक्त केला आनंद; आज देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला - उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

अमित शहा (Amit Shah)  यांनी आज जम्मू कश्मीर आणि लद्दाख या राज्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचे सध्या देशभरात प्रतिसाद बघायला मिळाला आहे. महाराष्ट्रात भाजपाचे मित्रपक्ष असणारी शिवसेना यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आज मुंबईत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी मीडीयाशी बोलताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा यांचे कौतुक केले आहे. देशात पोलादीपणा अजून कायम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  Jammu and Kashmir मधील Article 370 रद्द, जम्मू कश्मीर, लद्दाख आता केंद्रशासित प्रदेश; मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटवल्याचं जाहीर झाल्यानंतर आता भारत देश स्वतंत्र झाला आहे असे म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारचं कौतुक करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुंबई: जम्मू कश्मीर मधील कलम 370 रद्द; शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांचं सेलिब्रेशन सुरू

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिवसेना भवनाबाहेरदेखील जंग़ी सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. संसदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाषण करून या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेमध्ये भाजपा- शिवसेनेच्या वचननाम्यातील एक मोठं वचन पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.