मुंबई: जम्मू कश्मीर मधील कलम 370 रद्द; शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांचं सेलिब्रेशन सुरू
Shiv Sena Celebration (Photo Credits: Twitter)

आज राज्यसभेमध्ये अमित शहा यांनी जम्मू कश्मिरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम 370 आणि 35 A रद्द करून जम्मू कश्मीरचे त्रिभाजन करून जम्मू कश्मीर आणि लद्दाख या राज्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले आहे. आता भाजपाच्या मित्रपक्षांनी देशात सेलिब्रेशन करायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातही शिवसेना पक्षाकडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. आज दुपारी शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिक जल्लोष करणार आहे. हे सेलिब्रेशन दुपारी 2 वाजता असेल अशी माहिती देण्यात आली आहे. Jammu and Kashmir मधील Article 370 रद्द, जम्मू कश्मीर, लद्दाख आता केंद्रशासित प्रदेश; मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

जम्मू कश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता राजकीय घडामोडींना 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वेग आला आहे. यामध्ये पीडीपीसह काही नेते नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर जम्मू कश्मीरमध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे. काश्मिर मधील तणावग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राज्यांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्विट

थोड्याच वेळात नरेंद्र मोदी देखील या विषयावर देशाला संबोधणार आहेत.