मागील 70 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून Article 35A आणि Article 370 मुळे काश्मिर धुमसत होतं. मात्र आता जम्मू कश्मिरमधील आर्टिकल 370 रद्द करण्याची शिफारस करण्याची माहिती आज राज्यसभेत अमित शहा यांनी दिली आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मिरचे त्रिभाजन करण्यात आले आहे. राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, आता कश्मिर आणि लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. मात्र विधानसभा कायम राहणार आहे. देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय आहे. याद्वारा जम्मू काश्मिरमध्ये पुनर्रचना होणार असल्याची माहिती आज राज्यसभेमध्ये अमित शहा यांनी दिली आहे. अमित शहा यांच्या निवेदनापूर्वीच संसदेमध्ये विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. Jammu and Kashmir: काय होतं जम्मू-कश्मीरमधलं कलम 35A आणि 370, जाणून घ्या सविस्तर
जम्मू काश्मिरमध्ये अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता राजकीय घडामोडींना 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वेग आला आहे. यामध्ये पीडीपीसह काही नेते नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर जम्मू काश्मिरमध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे. काश्मिर मधील तणावग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राज्यांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जम्मू कश्मीर मध्ये Article 370 रद्द झाल्यानंतर भौगोलिक रचना,राष्ट्रध्वज यांच्यासोबत बदलणार या '10' गोष्टी
Official Gazette of India notification for abolition of Article 370 from Constitution of India. Historical document of full integration of Jammu, Kashmir and Ladakh with India. pic.twitter.com/BpSGwICOmS
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 5, 2019
काश्मिरमध्ये 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून उमर अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवल्यानंतर राजकीय नेत्यांनी याबाबत आपली मत व्यक्त करताना निषेध केला आहे. आज सकाळी केंद्रीय कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.