Covid-19 Consequence: कोरोनाचा संसर्ग होताच शरिरातील 'हा' भाग कमजोर होणाची शक्यता; कोरोनाबाधितांनी सांगितला धक्कादायक अनुभव
Doctors (Photo Credits: Pixabay)

कोरोनाने (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास, तोंडाची चव जाणे, कशाचाही वास न येणे, अशी लक्षणे आढळून येतात. दरम्यान, कोरोनाची नवनवीन लक्षणे समोर येऊ लागली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये दात आणि हिरड्यांशी संबंधित लक्षणे दिसू लागली आहे. कोविड झालेल्या रुग्णांचे दात कमजोर होऊ शकतात. तसेच त्यांच्या हिरड्या कमजोर होऊन अचानक त्यांचे दात तुटण्यासारखी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. द न्यूयार्क टाईम्सने याबाबत माहिती दिली आहे.

न्यूयार्कमध्ये राहणाऱ्या फराह खेमिली (43) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. विंटरग्रीन ब्रेथ मिंट खाल्ले असताना त्यांना हिरड्या कमजोर झाल्याचे जाणवले आणि काही तासांतच त्यांचा दात तुटला. महत्वाचे म्हणजे, त्यांना दाताची कोणतीही समस्या नव्हती. खेमिली यांचा दात पडला, त्यावेळी त्यांना कोणतीही वेदना किंवा रक्त आले नाही. खेमिली यांनी आपला अनुभव ऑनलाईन सपोर्ट ग्रुपमध्ये मांडला. त्यावेळी ग्रुपमधील अनेकांना हा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कोरोनाबाधितांमध्ये अशी काही लक्षणे दिसू शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कोरोना संक्रमणामुळे दात तुटू शकतात असे ठोस पुरावे सापडले नाहीत. हे देखील वाचा- Covishield Vaccine Update: कोविशिल्ड लशीबाबत सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांची महत्वाची माहिती

दंतरोगतज्ज्ञांच्या मते, 2012 साली सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनच्या अहवालात असे म्हटले आहे की, वयाच्या तिशीनंतर 47 टक्के लोकांमध्ये हाडे कमजोर होऊन दात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येशी कोरोनाचा काहीही संबंध नाही. तूर्तास या विषयावर संशोधन सुरु आहे, अशी माहिती समोर आली आहे.