
Paramilitary Forces Attack In Sudan: पश्चिम सुदानमधील (Western Sudan) एल फाशेर येथील ठिकाणी अर्धसैनिक रॅपिड सपोर्ट फोर्सेस (Paramilitary Rapid Support Forces) ने केलेल्या गोळीबारात किमान 68 जण ठार झाले. तसेच 19 जण जखमी झाले. सुदानीज डॉक्टर्स नेटवर्कने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'एल फाशेरमध्ये आरएसएफने केलेल्या एका नवीन हत्याकांडात, उत्तर दारफुरमधील एल फाशेर येथील सौदी रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ल्यात 68 रुग्ण आणि त्यांचे साथीदार ठार झाले आणि 19 जण जखमी झाले.'
हल्ल्यात रुग्णालयाचा आपत्कालीन विभाग पूर्णपणे नष्ट -
दरम्यान, शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक गैर-सरकारी गट एल फाशेरमधील प्रतिकार समितीच्या समन्वयाने एका निवेदनात पुष्टी केली की, सौदी रुग्णालयावर आरएसएफच्या हल्ल्यात 68 जण मृत्युमुखी पडले आणि डझनभर जखमी झाले. हल्ल्यामुळे रुग्णालयाचा आपत्कालीन विभाग पूर्णपणे नष्ट झाला. (हेही वाचा -Hamas-Israel Ceasefire: हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका; गाझा युद्धबंदी कराराचा भाग म्हणून इस्रायल 200 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार)
दारफुर प्रदेशाचे राज्यपाल मिन्नी आर्को मिन्नावी यांनी आरएसएफ हल्ल्याचा निषेध केला. एल फाशेरमधील रहिवाशांना आरोग्य सेवा प्रदान करणारा एकमेव विभाग होता, असे मिन्नावी यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले. यापूर्वी, पश्चिम सुदानमधील उत्तर दारफुर राज्यातील एका गावात निमलष्करी आरएसएफने केलेल्या हल्ल्यात किमान 18 नागरिक ठार झाले आणि पाच जण जखमी झाले होते. (हेही वाचा - Israel-Hamas Ceasefire In Gaza: गाझामध्ये इस्रायल-हमास युद्धबंदी लागू; पंतप्रधान नेतन्याहू यांनी केली घोषणा)
राज्याच्या आरोग्य विभागाचे महासंचालक इब्राहिम खातिर यांनी रविवारी शिन्हुआला सांगितले की, शनिवारी, आरएसएफ मिलिशियाने उत्तर दारफुरमधील उम कडादा जिल्ह्याच्या पूर्वेकडील जेबेल हिल्ला गावात नरसंहार केला. हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांना गुन्हेगारांना जबाबदार धरण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
सुदानी सशस्त्र दल आणि आरएसएफ यांच्यातील विनाशकारी संघर्ष -
आंतरराष्ट्रीय संघटनांनुसार, एप्रिल 2023 च्या मध्यापासून सुदानमध्ये सुदानी सशस्त्र दल आणि आरएसएफ यांच्यातील विनाशकारी संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये किमान 27 हजार लोकांचा मृत्यू झाला. तसेच 15 दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले, असे आंतरराष्ट्रीय संघटनांनी म्हटले आहे.