Hamas released four Israeli hostages (फोटो सौजन्य - X/@JustHallel)

Hamas-Israel Ceasefire: इस्रायल गाझा युद्धबंदी कराराचा (Israel Gaza Ceasefire Agreement) भाग म्हणून 200 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. शनिवारी हमासने चार इस्रायली महिला सैनिकांची सुटका (Hamas Released Four Israeli Hostages) केल्यानंतर इस्त्रायल लवकर कैद्यांची सुटका करेल. युद्धबंदी करारांतर्गत, हमासने शनिवारी चार इस्रायली महिला सैनिकांना सोडले. रेडक्रॉसने या महिला कैद्यांना आंतरराष्ट्रीय समितीकडे सोपवले. लष्करी गणवेशात येणाऱ्या महिलांना पाहून त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

इस्रायल 200 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार -

या महिला सैनिकांना 200 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात सोडण्यात आले आहे. चारही महिला सैनिकांना गाझा येथे बांधलेल्या एका व्यासपीठावर हमास सशस्त्र सैनिकांच्या उपस्थितीत आणण्यात आले. यावेळी पॅलेस्टिनी लोकांचा मोठा जमाव उपस्थित होता. यावेळी इस्रायली महिला सैनिकांनी हात हलवून आनंद व्यक्त केला. हमासने सोडलेल्या महिला सैनिकांची नावे करीना अरिव, डॅनिएला गिल्बोआ, नामा लेव्ही आणि लिरी अल्बाग अशी आहेत. या महिला सैनिक गाझाच्या सीमेवरील एका देखरेखीच्या चौकीवर तैनात होत्या. या काळात त्याचे हमासच्या सैनिकांनी अपहरण केले. (हेही वाचा - Israel-Hamas Ceasefire In Gaza: गाझामध्ये इस्रायल-हमास युद्धबंदी लागू; पंतप्रधान नेतन्याहू यांनी केली घोषणा)

महिला सैनिकांच्या सुटकेनंतर इस्रायलमध्ये आनंदाची लाट -

चार महिला सैनिकांच्या सुटकेच्या बातमीने इस्रायलमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या सैनिकांचे कुटुंब त्यांच्या सुटकेनंतर आनंद व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. महिला सैनिक असलेल्या अल्बागच्या मित्रांनी सांगितले की, लिरी अल्बाग एक हिरो आहे. (हेही वाचा -Israel Hamas Ceasefire and Hostage Deal: इस्रायल, हमासमध्ये युद्धबंदी, ओलीस सूटका करार; अमेरिकेची मध्यस्थी, गाझामध्ये शांतता)

इस्त्रायल-हमास करार -

7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमासमधील युद्ध सुरू झाले. सुमारे 15 महिन्यांनंतर, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थी आणि अमेरिकेच्या दबावामुळे युद्ध संपले. या करारानुसार, इस्रायल प्रत्येक ओलिसाच्या बदल्यात सुमारे 30 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल. यापूर्वी हमासने तीन ओलिसांना सोडले होते. त्याच वेळी, इस्रायलने 90 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले होते.