Photo Credit- X

Afghan-Pakistani Border Clash: एकेकाळी मित्र मानले जाणारे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आज एकमेकांच्या विरुद्ध उभे(Pakistan Taliban Conflict) आहेत. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान इस्लामाबाद आणि काबूल यांच्यातील शत्रुत्वाचे सर्वात मोठे कारण बनले आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या 19 सैनिकांनी आपला जीव गमावला. त्याशिवाय, तीन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला.(Pakistan Attack on Afghanistan: अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यात मृतांचा आकडा 46 वर; मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश)

तीन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला

आफगाणच्या दांड-ए-पाटण जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांनी डागलेल्या मोर्टार शेल्समुळे तीन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिटिका प्रांतात मंगळवारी रात्री पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर या चकमकी झाल्या. या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 51 जणांचा मृत्यू झाला होता.

मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात

एकेकाळी मित्र मानले जाणारे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आज एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान इस्लामाबाद आणि काबूल यांच्यातील शत्रुत्वाचे सर्वात मोठे कारण बनले आहे. पाकिस्तानी सशस्त्र सेना आणि राज्याविरुद्ध दहशतवादी मोहीम राबवून पाकिस्तान सरकारला उलथून टाकणे हा टीटीपीचा उद्देश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैन्य पाकिस्तानमध्ये निवडून आलेल्या सरकारची हकालपट्टी करू इच्छित आहे. इस्लामिक कायद्याच्या व्याख्यावर आधारित कट्टरतावादी शासनाचा पाया घालू इच्छित आहे.

टीटीपीचे महत्त्वाचे क्षेत्र

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील आदिवासी भाग हा टीटीपीचा बालेकिल्ला आहे. जिथून ते आपल्या दलात सैनिकांची भरती करतात. पाकिस्तान हा परंपरागतपणे तालिबानचा समर्थक मानला जात आहे. 2021 मध्ये, जेव्हा तालिबानने काबूलमध्ये दुसऱ्यांदा सत्ता घेतली, तेव्हा इस्लामाबादने असे गृहीत धरले की त्यांच्यातील चांगले संबंध पुन्हा सुरू होतील. मात्र, सते फार काळ सुरू राहिले नाही.