पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी सर्व हिंदू नागरिकांना दिवाळी 2020 (Happy Diwali 2020) च्या शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान खान (Imran Khan) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन या शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान खान यांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या ट्विटरवर विविध युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रतिक्रिया संमीश्र स्वरुपाच्या आहेत.
दरम्यान, ट्विटरवरही दिवाळी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट केली जात आहे. त्यासाठी ट्विटरने गेल्या काही दिवसांपासून दिवाळीसाठी काही हॅशटॅग आणि काही चिन्हेही लॉन्च केली आहे. ट्विटरवती दिवाळी 2020 ( Diwali 2020) हा हॅशटॅग वापरला की लगेचच एका पणतीचे चिन्ह दिसते. एखादी महत्त्वाची घटना, घडामोड, उत्सव असेल तर ट्विटर प्रामख्याने असे चिन्ह तयार करते. (हेही वाचा, पाकिस्तान Grey List मध्येच राहणार, FATF चा इमरान खान यांना झटका)
एका बाजूला भारत, पाकिस्तान आणि जगभरात दिवाळीचा उत्सव सुरु आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताची कुरापत काढत आहे. आजही पाकिस्तानने भारताची कुरापत काढली. सीमेपलीकडून भारतावर गोळीबार करण्यात आला. भारतानेही पाकिस्तानला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. या वेळी तीन भारतीय जवान शहीद झाले. तर तीन जखमी झाली. तीन भारतीय नागरिकांचाही या वेळी मृत्यू झाला. तर पाकिस्तानचे 11 सैनिक ठार झाले.
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केला. त्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या कारवाईत आतापर्यंतचे सर्वात अधिक नुकसान झधाल्याची कबुलीही पाकिस्तानी लष्कराने या वेळी दिली आहे.