पाकिस्तान Grey List मध्येच राहणार, FATF चा इमरान खान यांना झटका
इम्रान खान (Photo Credit : Youtube)

Pakistan In Grey List: पाकिस्तान कडून सातत्याने दहशतवाद्यांसह दहशतवादी संघटनांना खतपाणी घातले जात आहे. याच दरम्यान फायनेंशिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना झटका बसला आहे. हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा एफएटीएफच्या अॅक्शन प्लॅनच्या सर्व 27 मापदंडाचे पालन करण्यास पाकिस्तान अयशस्वी ठरला आहे.(Coronavirus in Pakistan: पाकिस्तान येथे कोरोनामुळे पुन्हा होऊ शकतो विध्वंस, इमरान खान झाले त्रस्त)

खरंतर पाकिस्तान एफटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र पाकिस्तानला यामधून बाहेर पडण्यासाठी यश प्राप्त होत नाही आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपाखाली पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.(पाकिस्तान-बांग्लादेश यांच्यात वाढतीय जवळीक? इमरान खान यांचा शेख हसीना यांना फोन)

तर एफएटीएफ प्लेनरी मध्ये तुर्कीने प्रस्ताव दिला की, 27 मधील शिल्लक सहा मापदंड पूर्ण करण्याची वाट पाहण्याऐवजी सदस्यांना पाकिस्तानच्या उत्तम कामांबद्दल विचार करायला हवा. त्याचसोबत एफएटीएफ ऑन-साइड टीमला आपल्या मूल्यांकनला अंतिम रुप देण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला पाहिजे. ज्यावेळी प्रस्ताव 38 सदस्यांच्या प्लॅनेरी समोर ठेववा गेला त्यावेळी सदस्यांनी सुद्धा त्याला मंजूरी दिली नाही. ऐवढेच नाही तर चीन, मलेशिया आणि सौदी अरेबिया यांनी सु्द्धा याचा विरोध केला. त्यामुळे आता एफएटीएफने पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी एफएटीएफने कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा महिना चार महिन्यांसाठी टाळला होता. एफएटीएफच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला चार महिन्यांसाठी दिलासा मिळाला होता. खंरतर पॅरिस स्थित एफएटीएफची जून महिन्यामध्ये बैठक होणार होती. त्यामध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये काढून टाकावे की ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे या संदर्भात निर्णय घेतला जाणार होता.