पाकिस्तान (Pakistan) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात जवळीक निर्माण होत असल्याचा कयास आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांना आहे. याला निमित्त ठरले आहे ते पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्यातील टेलीफोन संवाद. होय, इमरान खान यांनी शेख हसीना यांना फोन केल्याचे वृत्त आहे. उभय देशांच्या या नेत्यांनी एकमेकांसोबत कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासंबंधी उचललेल्या पावलांबाबत चर्चा केली. उभय देशांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
बांग्लादेशच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इमरान खान यांनी कोविड 19 बाबात बांग्लादेशमध्ये होत असलेल्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. बांग्लादेशमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरस संसर्गाचे 2,11,000 रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर, आतापर्यंत 2709 नागरिकांचे बळी कोरोनामुळे गेले आहेत. (हेही वाचा, Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांच्या मदतीचे सर्व मार्ग पाकिस्तानने रोखले- परराष्ट्र मंत्रालय)
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे 2,67,428 नागरिक संक्रमित झाले आहेत. तर 5,677 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सांगितले जात आहे की दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये साधारण 15 मिनिटे चर्चा झाली. या वेळी इमरान खान यांनी कोरोना व्हायरस संक्रमन नियंत्रणासाठी शेख हसीना यांनी उचललेल्या पावलांचे जोरदार कौतुक करण्यात आले.
इमरान खान यांनी पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस संकट निपटण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबतही हसीना यांना माहिती दिली. तसेच, विकसनशिल देशांना कर्जातून काही काळ सवलत मिळावी याबाबत आपली भूमिकाही सांगितली. बांग्लादेशमध्ये नुकत्याच आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दलही खान यांनी दु:ख व्यक्त केले.