Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

पाकिस्तानी कारागृहात बंद असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jakhav) जाधव यांचे कायदेशीर मदत घेण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (External Affairs Ministry) एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. कुलभूषण जाधव यांना हेरगीरी केल्याच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी न्यायालयात चालवलेल्या खटल्यात त्यांना मृत्यूदंडाची (Death sentence) शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, प्रत्येक वेळी पाकिस्ताने त्याची वाकडी चालच खेळली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारताच्या काउन्सिलर अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना कायदेशीर कागदपत्रे देऊ दिली नाहीत. तसेच त्यांना रिव्ह्यू पीटीशन दाखल करण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नीसुद्धा मिळू दिली नाही. पाकिस्तानकडून सांगण्यात आले की, पाकिस्तानी वकीलाच्या माध्यमातून ही कागदपत्रे त्यांना देता येतील. परंतू, पुढे पाकिस्ताने तेही केले नाही. आम्ही कागदपत्रांसांठी आमच्या पाकिस्तानी वकीलाने अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे, एफआयआर, चार्जशीट, फिल्ड मार्शल आदींच्या आदेशाची कॉपी देण्यासाठी अर्ज केला मात्र तो नाकारण्यात आला.

दरम्यान, इतर कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने भारताने 18 जुलै रोजी न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वकिलांनी सांगितले की, पॉवर ऑफ अॅटर्नी शिवाय इतर कागदपत्रांचे काहीच करता येऊ शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याच्या तारखेवरही साशंकता निर्माण केली आहे. आगोदर सांगितले की, 19 जुलै नंतर दाखल करु शकत नाही असे सांगितले. त्यानंतर सांगितले की, 20 तारखेनंतर दाखल करण्याचा अवधी समाप्त होईल. (हेही वाचा, Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांना वकील देण्याबाबत पाकिस्तान सरकारची इस्लामाबाद हाय कोर्टात याचिका)

पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात भारताचे सर्व मार्ग बंद केले आहेत. विना अडथळा काउन्सिलर अक्सेस न देणे. कागदपत्रे न देणे. स्वत:च सर्वोच्च न्यायालयात जाणे या सर्व गोष्टी दर्शवतात की पाकिस्तान केवळ नाटक करत आहे. पाकिस्तान ICJ सोबत आपल्याही ऑर्डिनंन्सचे उल्लंघन करत आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.