Coronavirus in Pakistan: पाकिस्तान येथे कोरोनामुळे पुन्हा होऊ शकतो विध्वंस, इमरान खान झाले त्रस्त
इमरान खान (Photo Credits: Facebook)

Coronavirus in Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देशातील काही भागात कोरोना व्हायरसची नवी प्रकरणे वाढण्यासह येत्या महिन्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. डॉन न्यूजच्या मते, पंतप्रधान इमरान खान यांनी सोमवारी एका कार्यक्रमात असे म्हटले की, मला अशी शंका आहे की शहरात कोरोना व्हायरच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते. आरोग्य अधिकाऱ्यांच्याद्वारे पंजाब प्रांतात खासकरुन लाहौर येथे रुग्णांचा आकडा वाढत असल्याबद्दल चेतावणी दिल्यानंतर आणखी एक दुसरी लाट येणार असल्याची शक्यता आहे. तर कराची येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या महासंकटाच्या दरम्यान उपस्थितीत करण्यात आलेले उपाय हे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विकार केले गेले. खान यांनी असे म्हटले की, अपेक्षित असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल आपल्याला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. मला भीती आहे की, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात फैसलाबाद, लाहौर, कराची, पेशावर आणि गुजरांवाला सारख्या शहरात जेथे प्रदुषण अधिक आहे तेथे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते.(Second Wave of COVID-19 in France: कोरोना व्हायरस संक्रमनाची दुसरी लाट; फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों यांच्याकडून अनेक शहरांमध्ये जमावबंदी)

इमरान खान यांनी पुढे असे ही म्हटले की, कोरोनाची प्रकरणी हळूहळू वाढत आहेत. अपेक्षा आहे की ते झपाट्याने वाढू नयेत. यावर आमचे लक्ष आहे. डॉन न्यूज नुसार, योजना आणि विकास मंत्री असद उमर यांनी घोषणा केली होती की, ताज्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने त्याचा दर 2.37 टक्क्यांवर पोहचला असून तो 50 दिवसांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनाचे 322452 रुग्ण समोर आले असून 6659 जणांचा बळी गेला आहे.