भारतातील टाळेबंदी (लॉकडाऊन) संपूर्ण हटविण्याचा विचार सुरु असतानाच एक महत्त्वपूर्ण वृत्त आले आहे. युरोपमधील काही देशांमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमनाची दुसरी लाट (Second Wave of COVID-19) आली आहे. त्यामुळे फ्रान्स देशातील काही प्रमुख शहरांमध्ये कर्फ्यू (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों (France President Emmanuel Macron) यांनी ही घोषणा केली आहे. फ्रान्स सरकारने लागू केलेले जमावबंदी आदेश हे फ्रान्सची राजधानी पॅरीस आणि देशातील इतर प्रमुख नऊ शहरांसाठी लागू आहे.
राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, येत्या शनिवारपासून (17 ऑक्टोबर) पासून देशातील प्रमुख नऊ शहरांमध्ये जमावबंदी लागू असेन. ही जमावबंदी रात्री 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत असणार आहे. फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी भर देत सांगितले की, ही जमावबंदी लिली (Lille), ग्रेनोबल (Grenoble), लियॉन (Lyon), मार्सिले (Aix-Marseille), रूएन (Rouen), सेंट इटियेन (Saint-Etienne), मोंटपेलियर (Montpellier ), टूलूज (Toulouse) आदी शहरांमध्ये लागू असेन. (हेही वाचा, Coronavirus वर मात केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी दिले पहिले सार्वजनिक भाषण; समर्थकांचे मानले आभार)
राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों यांनी पुढे बोलताना सांगितले की, आम्ही कोरोना व्हायरस संक्रमन रोखण्यात आम्हाला आलेले यश आम्ही अद्यापही गमवले नाही. सरकार कोरोना व्हायरस संक्रमनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे. कोरोना व्हायरस संसर्गाची लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अगदीच वेगळी आहे. ही चिंताजनक बाब आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार बुधवारपर्यंत फ्रान्समध्ये कोरोना व्हायरस संक्रमित 22,951 नव्या रुग्णांची नोंद झाली. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोना व्हास संसर्गामुळे 32 हजारांहून अधिक नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. सध्यास्थितीत फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांची संख्या 756,472 इतकी झाली आहे.