पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Photo Credits: IANS)

Coronavirus Pandemic: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला आहे. दिवसागणिक लखोंच्या संख्येने कोरोनाच्या रुग्णांमध्ये तुफान वाढ होत आहे. अशातच पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी भारताच्या जनतेच्या प्रति एकजुटता व्यक्त केली आहे. त्यासंदर्भातील ट्वीट सुद्धा इमरान खान यांनी केले आहे. त्यात खान यांनी असे म्हटले आहे की, या जागतिक महासंकटाच्या विरोधात सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे.(भारताला No Profit वर लस देण्याचा प्रस्ताव, अमेरिकेच्या Pfizer कंपनीची घोषणा)

शनिवारी ट्वीट करत खान यांनी पुढे असे म्हटले की, मी भारताच्या जनतेच्या प्रति माझी एकजुटता व्यक्त करतो आहे. ते कोरोनाच्या भयंकर लाटेसोबत लढत आहेत. आमच्या बाजूचा आणि जगभरातील कोरोनामुळे संकटात सापडलेल्यांची प्रकृती लवकरच ठीक व्हावी अशी अपेक्षा करतो.(Pakistan मध्ये Facebook, Twitter, Instagram, TikTok वर तात्पुरता बॅन; Anti-French Protests चा परिणाम)

Tweet:

दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महसूद कुरैशी यांनी भारतीयांच्या प्रति शनिवारी समर्थन व्यक्त केले आहे. तसेच कोरोनाचा फटका बसलेल्या परिवारांच्या प्रति आपली सहानभुती सुद्धा व्यक्त केली आहे. कुरैशी यांनी असे म्हटले की, कोविड19 चे संकट असे आठवून देते की मानवीय मुद्द्यांवर राजकरण न करता पावले उचलली पाहिजेत.

दरम्यान, भारतात कोरोनाचे संकट अधिकच वाढत चालले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या द्वारे शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एका दिवसात कोरोनाचे 3,46,786 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 1,66,10,481 वर पोहचला आहे. तर 25 लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली असून या आकडेवारीनुसार एका दिवसात 2624 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 1,89,544 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.