पाकिस्तान मध्ये फेसबुक, ट्विटर,व्हॉट्सअॅप यूट्यूब, टेलीग्राम सह टिकटॉक वर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानच्या टेलिकॉम अथॉरिटीने देशातील कायदा व सुव्यवस्था काबूत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगत आले आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान मध्ये तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) कडून निदर्शनं सुरू आहेत.
दरम्यान रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक ठेवला जाणार आहे. तसेच असे सांगण्यात आले आहे की सोशल मीडियामधून भावना भडकवणारा सारा मजकूर काढण्यात यावा. TLP चीफ सार रिझवी ला अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंदोलन पेटलं आहे.तेथे अॅन्टी फ्रेंच प्रोटेस्ट काढले जात आहेत.
सध्या पाकिस्तान मध्ये फ्रांस विरूद्ध अनेक संघटना आंदोलनं करत आहेत. यामध्ये टीएलपी चा देखील समावेश आहे. पाकिस्तान मध्ये टीएलपीवर बंदी आहे. फ्रांसमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यावर काढलेल्या एका चित्रावरून वाद सुरू झाला आहे.त्याचा निषेध करण्यासाठीच आता पाकिस्तानात फ्रान्स विरूद्ध आंदोलनं सुरू आहेत. यामध्येच फ्रान्सने देखील त्यांच्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
मागील वर्षी फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांनी मोहम्मद पैगंबर यांचे चित्र हे फ्रीडम ऑफ स्पीच सांगत पाठिंबा दिला होता. यानंतर अनेक मुस्लीम देशांनी देखील यानंतर फ्रांस वर टीका केली होती.