भारताला No Profit वर लस देण्याचा प्रस्ताव, अमेरिकेच्या Pfizer कंपनीची घोषणा
Pfizer (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा फटका जगाला बसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसह लसींची मागणी गेल्या काही काळापासून अधिक वाढली गेल्याचे दिसून येते आहे. याच दरम्यान, आता अमेरिकेची फार्मास्युटिकल कंपनी फायझर यांनी भारत सरकारला आपली कोरोनावरील लसीचा पुरवठा Not For Profit रेटवर देण्याचा प्रस्ताव ठरवला गेला आहे.(Emirates कडून दुबई आणि भारतासाठी विमानसेवा येत्या 25 एप्रिल पासून 10 दिवसांसाठी रद्द, वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय)

कंपनीच्या प्रवक्तांनी गुरुवारी असे म्हटले आहे की, फायझर भारतात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी आपली लस नो प्रॉफिटवर देण्याचा प्रस्ताव ठरवण्यात आला आहे. म्हणजेच फायझर कंपनी लस भारताला देत असल्यास ते त्यामधून होणारा नफा घेणार नाही आहेत. फायझर कंपनीचे असे म्हणणे आहे की, भारत सरकारसोबत बातचीत सुरु आहे. लसीकरण मोहिमेसाठी लस उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.

याच दरम्यान कंपनीच्या प्रवक्ताने भारतात अमेरिकेच्या लसीसंदर्भातील जाहीर केलेला एक रिपोट्स फेटाळून लावला आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, फायझर कंपनीने आपल्या लसीचा रेट ठरवला आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, जगभरात त्यांची लस समान आणि स्वस्त दरात पोहचवण्याच्या दिशेने काम केले आहे. विविध देशांनुसार लसीचा रेट ठरवण्यात आला आहे.(Sputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत)

कोरोनाच्या काळात फायझर कंपनीचे हेच प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे की, फक्त लसीकरणासाठीच सरकारला समर्थन दिले जाणार आहे. हाच दृष्टीकोन भारतासाठी सुद्धा असणार आहे. दरम्यान, भारतात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारने गेल्या आठवड्यात Moderna, फायझर आणि Johnson & Johnson द्वारे निर्मित करण्यात आलेल्या लसीचा भारतात वापर करण्यासंदर्भात चर्चा केली आहे. मात्र सध्या भारतात बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरमची कोविशिल्ड लसीचा वापर केला जात आहे. या लसी विदेशात सुद्धा पाठवल्या जात आहेत.