भारताशी तणावपूर्ण स्थितीदरम्यान इमरान खान म्हणाले, 'पाकिस्तान अणुबॉम्बचा प्रथम वापर करणार नाही'
पीएम मोदी आणि इमरान खान (Photo Credits: Facebook)

जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधून अनुच्छेद 370 हटवण्याबाबत भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील संबंधांविषयीच्या भांडणात चर्चेत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी आता आपल्या आधीच्या वक्तव्यावरून सोमवारी यू टर्न घेतला. काही दिवसांपूर्वी खान यांनी आम्ही काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, दोन्ही देशांकडे अण्वस्त्र असल्याचे सांगत, भारताला आण्विक युद्धाची धमकी दाखवली होती. मात्र, आता भारताने त्यांच्या या धमकीला कोणताही प्रतिसाद न दिल्याचे पाहून, खान यांनी आता या वक्तव्यावरून माघार घेत पाकिस्तान भारतविरुद्ध अणवस्रांचा वापर प्रथम करणार नसल्याचे त्यांनी म्हटले असल्याचे ‘रॉयटर्स’ने वृत्त दिले आहे. (इमरान खान काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्र बैठकीत पुन्हा उठवणार आवाज, सर्व स्तरावर जाण्याची दाखवली तयारी)

विशेष म्हणजे यापूर्वी खान यांनी काश्मीरच्या मुद्दय़ावर जागतिक समुदायाच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि म्हणाले की, :आपण काश्मीरचा आवाज बनू आणि संयुक्त राष्ट्रांसह सर्व जागतिक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करू. याचबरोबर इमरानने काश्मीरसाठी युद्धाचीही धमकी दिली होती. मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या असेंब्लीच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना खान म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झाल्यास जागतिक समुदाय याच्यासाठी जबाबदार असेल.

इमरान म्हणाले की, काश्मीर आणि पाकिस्तानकडे सगळ्या जगाची नजर आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा आवाज उठविणारा मी मेसेन्जर होईल. इम्रान म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानविरूद्ध कोणतीही आक्रमकता दर्शविली तर त्यांचा देश पूर्ण ताकदीने प्रतिसाद देईल. खान म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने कारवाईची योजना आखली असल्याची पाकिस्तानी लष्कराला पूर्ण माहिती आहे.