Pulwama Terror Attack: भारताने युद्ध छेडल्यास जशास तसे उत्तर देऊ - इम्रान खान; पुलवामा हल्ल्याचे भारताचे आरोप फेटाळले
Imran Khan on Pulwama Terror Attack (Photo Credits: Twitter/ANI)

Pakistan PM Imran Khan Reaction on Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिल्यांदा मीडियासमोर समोर आले आणि त्यांनी पुलावामा दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तान यांचा संबंध यावर भाष्य केले. हल्ल्याबाबत कोणतेही पुरावे नसाताना भारताकडून पाकिस्तानवर बिनबुडाचे आरोप होत असल्याचं इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. तसेच भविष्यात पाकिस्तानवर भारताने युद्ध करून चाल केल्यास आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ असा इशाराही दिला आहे. शस्त्र हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचा इशारा

70 हजार पाकिस्तानी दहशतवादामुळे मारले गेले अशी परिस्थिती असताना आम्ही पाकिस्तानामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. काश्मीरचा प्रश्न चर्चेने सोडवणं गरजेचे आहे. भारताने आमच्यासोबत दहशतवादावर चर्चा करावी अधी मागणी इम्रान खान यांनी केली आहे. दहशतवादावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.

14 फेब्रुवारीच्या दुपारी सीआरपीएफच्या जवानांवर जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी मूळ असलेल्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर सर्च ऑपरेशनमध्ये भारताकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मारला गेला. चकमकीत मेजरसह 4 जवान शहीद झाले तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय सैनिकांना यश आलं.