लेफ्टिनेंट जनरल केजीएस ढिलन्न (Photo Credit-ANI)

पुलवामा येथील पिंगलान भागात झालेल्या भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील चकमकीनंतर भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने आज (19 फेब्रुवारी) पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच चिनार कॉर्प्सचे लेफ्टिनेंट जनरल के.जी.एस ढिल्लन यांनी सांगितले की, "हल्ल्यातील सुत्रधाराचा 100 तासांच्या आत खात्मा करण्यात आला." तसंच या हल्ल्यात  पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा (ISI) हात असून त्यांच्या मदतीनेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हल्ला केल्याचे लष्कराने स्पष्ट केले. (भारताचा पाकिस्तानवर सायबर हल्ला; 200 हुन अधिक वेबसाईट्स हॅक)

तसंच जम्मू-काश्मीरमधील लोकांना आवाहन करण्यात आले की, "दहशतवादाकडे वळलेल्या मुलांना समजवा आणि त्यांना शरणागती पत्करायला सांगा. सेना आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. आता जो कोणी सेनेविरोधात बंदुक उचलेले तो मारला जाईल." तसंच सामान्य नागरिकांना इजा पोहचवण्याचा आमचा उद्देश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यांनतर पिंगलान येथे काल झालेल्या चकमकीत मेजरसह 4 जवान शहीद झाले तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय सैनिकांना यश आलं. तसंच पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला.