पुलवामा : पिंगलान येथे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैनिकांना यश, चकमक सुरूच
Pulwama ( File Photo)

Pulwama Encounter : मागील काही तासांपासून पुलवामा (Pulwama) येथील पिंगलान (Pinglan) भागात दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आज सकाळी या चकमकीमध्ये 4 जवान शहीद झाले आहे. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय सैनिकांना यश आलं आहे. एएनआयने दोन दहशतवादी  (Terrorists) ठार झाल्याचे वृत्त दिले असले तरीही अजून ही चकमक सुरूच आहे. जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे पुन्हा एकदा चकमक सुरु; मेजरसह 4 जवान शहीद

14 फेब्रुवारी दिवशी भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 40 जवान ठार झाले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर ही चकमक महत्त्वपूर्ण आहे. Hizbul Mujahideen  ठार केलेले दहशतवादी या संघटनेचे असल्याची  प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तसंस्थांकडून देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीदला घेरण्यात यश आलं आहे. त्याच्यासोबत 2-3 आतंकवादी असल्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली चकमक जेथे आत्मघाती हल्ला झाला त्या जागेपासून सुमारे 10 किमी अंतरावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.  दरम्यान पुलवामा येथे इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.