जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे पुन्हा एकदा चकमक सुरु; मेजरसह 4 जवान शहीद
Representational Image (Photo Credits: IANS)

जम्मू काश्मीर (Jammu And Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) येथे पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु झाली आहे. पुलवामा येथील पिंगलान (Pinglan)  भागात जैश-ए-मोहम्मदचे 3-4 दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत 3 जवान शहीद झाले आहेत. यात एका मेजरचाही समावेश आहे. तर एक जवान जखमी झाला आहे.  या दरम्यान पुलवामा येथे इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. या भागाला घेरण्यात आले असून पहाटेपासून चकमक सुरु आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. यात तब्बल 40 जवान शहीद झाले. त्यानंतर आता पुलावामा जिल्ह्यातील पिंगलान येथे दहशतवाद्यांविरुद्ध चकमक सुरु आहे.