Pulwama Terror Attack: भारताचा पाकिस्तानवर सायबर हल्ला; 200 हुन अधिक वेबसाईट्स हॅक
Representational Image (File Photo)

Pulwama Terror Attack: काही दिवसांपूर्वीच पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानच्या 200 हुन अधिक सरकारी वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. पिंगलान येथे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैनिकांना यश, चकमक सुरूच

टीम आय क्रु (Team I Crew) यांनी या वेबसाईट्स हॅक केल्या असून त्याची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर केलेला हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.

या साईट हॅक केल्यानंतर हॅकर्सने साईटवर पाकिस्तानसाठी एक खास मेसेज लिहिला आहे. "आम्ही #14/2/2019 हा दिवस कधीच विसणार नाही", असा संदेश या साईट्सवर दिसत आहे. या सायबर हल्ला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित करण्यात आला आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. यात पाकिस्तानच्या जैन-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा हात होता.