जम्मू-काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा मोठा निर्णय; 5 सप्टेंबर पर्यंत हवाई हद्द बंद राहणार
Representational Image (Photo credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कलम 370 हटवल्यानंतर शेजारील देश पाकिस्तान (Pakistan) चांगलाच अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला देखील परतण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील आपले हवाई क्षेत्र काही प्रमाणात बंद केले आहे. काश्मीरमधील कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. (कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानची सटकली, इमरान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांची भारताला युद्धाची धमकी)

याशिवाय परदेशी विमानांच्या उड्डाणांची उंचीही वाढविण्यात आली आहे. तसेच विमानांच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत. तसंच 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाकिस्ताच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे जारी केलेल्या नोटीसमध्ये तसे नमूद करण्यात आले आहे. लाहोर येथे परदेशी विमानांना 46 हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच अफगाणिस्तानमधून उडणाऱ्या विमानांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे सूचित केले आहे. यावर्षी पाकिस्तानने दुसऱ्यांदा आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यापूर्वी पाकिस्तानने भारताने बालाकोट येथील दहशतवादी स्थळांवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आपली हवाई हद्द बंद केली होती.

ANI Tweet:

भारतासोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याच्या निर्णयावर माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकिस्तानचा हा निर्णय 'अत्यंत दूरदर्शी' असल्याचे म्हटले आहे. (कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने घेतला भारतासोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय)

भारताशी द्विपक्षीय व्यापार संबंध स्थगित करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयामुळे अधिक नुकसान पाकिस्तानचेच होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तान भारताकडून अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयात करतो.