पाकिस्तानमधील एका माजी न्यायाधीश यांच्या नावावर 2224 गाड्या असल्याने सर्व नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. तसेच या गाड्यांच्या प्रकरणाने माजी न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टात खेचण्यात आले आहे.
सिकंदर हयात असे या पाकिस्तानच्या माजी न्यायाधीशांचे नाव आहे. मात्र न्यायाधीशांचे वकिल आणि त्यांच्याकडे एकच गाडी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु माजी न्यायाधीशांच्या नावावर 2224 एवढ्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती सुप्रिम कोर्टला देण्यात आली आहे. तसेच पंजाबच्या एक्ससाइज अँड टॅक्सेशन विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार हयात यांच्याकडे 2224 गाड्या असल्याचा पुरावा मिळाला आहे.
या घटनेप्रकरणी सुप्रिम कोर्टाने पंजाबच्या एक्ससाइज अँड टॅक्सेशन विभागाला याबद्दलची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.