नॉर्वेच्या पोलिसांनी शुक्रवारी पंतप्रधान एर्ना सोल्बर्ग (Prime Minister Erna Solberg) यांना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दंड ठोठावला आहे. खरंतर त्यांच्यावर असा आरोप आहे की, त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. नॉर्वेच्या वरिष्ठ पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडून दंड वसूली केली जात असल्याचे जाहीर केले. तर नॉर्वे, युरोप हे अशा देशांचा भाग आहेत ज्यांनी कोरोनाच्या परिस्थिती यशस्वी लढा देत असल्याचे मानले जात आहे. एर्ना सोल्बर्ग या तेथील एक लोकप्रिय पंतप्रधान असून त्या यंदाच्या वर्षात संसदीय निवडणूकीत सहभागी होणार आहेत.
नॉर्वेच्या पोलिसांनी असे म्हटले की, एर्ना सोल्बर्ग यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना 20 हजार क्राउंस म्हणजेच तब्बल 1.76 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तेथील वरिष्ठ पोलीस ओले सेवरुड यांनी ही माहिती दिली आहे. सोल्बर्ग यांच्यावर असा आरोप होता की, त्यांनी फेब्रुवारी महिन्या्च्या अखेरीस एक माउंटेन रिजॉर्टमध्ये आपला 60 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यासाठी 13 सदस्यांनी उपस्थितीत लावली होती. तर नॉर्वे सरकारने 10 पेक्षा अधिक जण एकाच ठिकाणी जमल्यास त्यावर बंदी घातली होती. दरम्यान, पीएम एर्ना यांनी त्यांच्या या चुकीमुळे माफी सुद्धा मागितली होती. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकरणात काही वेळेस दंड स्विकार केला जात नाही. मात्र त्या देशाच्या पंतप्रधान आहेत. सेवरुडच्या पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे ठरवत त्यांनी सर्व कायदे सर्वांसाठी समान आहेत. पण कायद्याच्या समोर सर्वच समान नाहीत असे म्हटले आहे.(Prince Philip Passes Away: ब्रिटनवर पसरली शोककळा; Queen Elizabeth II चे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन)
पोलीस चीफच्या मते, सामान्य जनतेत सामाजिक बंदीच्या प्रति विश्वा निर्माण करण्यासाठी हा दंड स्विकारणे योग्य आहे. पोलिसांनी असे ही म्हटले की, सोल्बर्ग आणि त्यांचे पती सिंड्रे फाइंस दोघांनी मिळून पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. तर ज्या रिजॉर्टमध्ये वाढदिवस साजरा केला गेला त्यांनी सुद्धा सर्व नियमांकडे दुर्लक्ष केले.