उत्तर कोरियन (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) सुमारे 20 दिवस रहस्यमयपणे अदृश्य राहिल्यानंतर दुनिये समोर आला. किम जोंग उन यांचे आरोग्य हे जगभरातील मीडिया आणि सरकारच्या आवडीचा विषय बनले आहे. म्हणून मागील आठवड्यात जेव्हा ते 20 दिवसांच्या अंतरानंतरफॅक्टरीच्या उद्घाटनाच्या दरम्यान पुन्हा लोकांसमोर आले तेव्हा त्यांच्या आरोग्याबद्दल सर्व अफवांनी ब्रेक घेतला असे वाटत होता. पण, असे घडत असल्याचे दिसत नाही, कारण हुकूमशहा किम जोंग यांच्याबद्दल नवीन गोष्टी समोर येत आहेत, याची पुष्टी झाल्यास जगभरात संताप निर्माण होऊ शकतो. किम जोंगबद्दल एक नवीन वृत्त समोर आले आहे ज्यात जो व्यक्ती रहस्यमय मार्गाने जाहीरपणे उपस्थित झाले तो खरं तर हुकूमशहा नव्हता तर उलट तो त्याचा बॉडी डबल असल्याचा दावा केला आहे. तथापि, लक्षात ठेवा की हा फक्त एक दावा आहे, ज्याच्या सत्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. (उत्तर कोरिया हुकूमशहा किम जोंग उन तब्बल 20 दिवसांनंतर जगासमोर; निधनाच्या अफवांना पूर्णविराम)
सोशल मीडियावर यूजर्स किमच्या नवीन आणि जुन्या फोटोचे विश्लेषण करत आहे. बॉडी डबल वापरली केला गेला आहे की नाही हे समजण्यासाठी यूजर्स दात आणि कानांवर विशेष भर देत आहेत. ब्रिटनचे माजी खासदार लुईस मेंश यांनीही असाच दावा केला आहे. त्यांनी लिहिले की त्या फोटोंमध्ये दात आणि इतर गोष्टींमध्ये स्पष्ट फरक दिसत आहे. बारकाईने बघितल्यास तुम्हालाही फरक कळेल. माजी खासदार लुईस मेन्शने लिहिले की ही ती व्यक्ती नाही. शिवाय, राज्य माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये किम जोंग उन यांचा बॉडी डबल असल्याचा सोशल मीडियावरील काही लोकांचा असा विश्वास आहे. त्यांच्या दातांमध्ये दृश्यमान फरक, मनगटावर चिन्ह आणि कानाच्या आकाराच्या आधारे हा दावा केला जात आहे.
ब्रिटनचे माजी खासदार लुईस मेंश यांचे ट्विट
It’s not the same person. But not going to argue it. Hairy moment when I thought my information was wrong. It wasn’t wrong though.
Not sure whether it suits us to go along with it or not, but these two are not the same. pic.twitter.com/rV3qgK281p
— Louise Mensch (@LouiseMensch) May 2, 2020
ट्विटरवर यूजर्सच्या प्रतिक्रिया
किम जोंग-उन खरा आहे का?
Is the Kim Jong-un appearing on May 1 the real one? 4 things to watch: 1. Teeth 2. Ears 3. Hair 4. Sister 金正恩露面被疑替身 網友提出4個理由. 1. 牙齒明顯不同 2 耳朵形狀不同 3 神情和頭髮 4 妹妹年輕了十歲 pic.twitter.com/ngKIyNtPpT
— Jennifer Zeng 曾錚 (@jenniferatntd) May 2, 2020
बॉडी डबल का?
The chipped incisor is a definite giveaway it’s not Kim Jong Un.
So why a body double? If he’s dead why not just announce it and crown his successor? https://t.co/AVUz7Kl9CS
— August September (@SeptAugustus) May 2, 2020
थोडा वेगळा दिसत आहे
Have y’all seen the latest pics of Kim Jong Un? He looks slightly different. My theory is either that he died and was replaced by a clone/lookalike, or was out of the public eye for so long bc he was recovering from plastic surgery
— 𝕖𝕥𝕙𝕒𝕟 (@BacquesJrel) May 2, 2020
जुने आणि नवीन फोटो
More of old and new photos "Kim Jong-un" to compare. 更多「金正恩」新老照片對比。 pic.twitter.com/zvaMlUpTcP
— Jennifer Zeng 曾錚 (@jenniferatntd) May 2, 2020
11 एप्रिलपासून बेपत्ता असलेले हुकूमशाह पहिल्यांदा 1 मे रोजी राजधानी प्योंगयांगजवळ सांचोन येथील खताच्या कारखान्यात एका कार्यक्रमात दिसला. यावेळी, राज्य माध्यमांनी किम जोंग उन यांची अनेक फोटोज प्रसिद्ध केले होते. या फोटोंना मुद्दा बनवून सोशल मीडियावर काही यूजर्स किमच्या मनगटावर ठिपका दाखवून खरा आणि बनावट यांच्यातील फरक दाखवत आहेत. दरम्यान, किम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांचाही बॉडी डबल असल्याचा दावा केला जात आहे.