SCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)
Umbrella Diplomacy (Photo Credits: Twitter, @PBNS_India)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आंतरराष्ट्रीय नेतेमंडळींमध्ये मानाचे स्थान आहे याची प्रचिती देणारा प्रसंग नुकताच पाहायला मिळाला. श्रीलंका (Srilanka)  आणि किरगिझस्तान (Kyrgystan) या दोन देशांचे राष्ट्रपती स्वतः नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्री धरून उभे असल्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सामान्यतः कोणत्याही नेत्याच्या सुरक्षा रक्षकाकडे किंवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याकडे हे काम सोपवण्यात येते पण हे फोटो पाहता मोदींचा थाट लक्षात आल्याशिवाय राहत नाही. नरेंद्र मोदी हे SCO Summit साठी किरगिझस्तान मधील बिशकेक (Bishkek)  येथे दोन दिवसासाठी गेले होते . समिट बैठक सुरु होण्याआधी देशाचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोव ( Sooronbay Jeenbekov) यांनी  मोदींचे स्वागत करण्यासाठी मोठा सोहळा आयोजित केला होता.

पाहा व्हायरल फोटोज

SCO Summit मधील एका कार्यक्रमाच्या दरम्यान जेव्हा अचानक पाऊस पडायला लागला तेव्हा सुरक्षा रक्षकाला सांगण्यापेक्षा जीनबेकोव यांनी स्वतःहून मोदींसाठी छत्री धरली होती. याचप्रकारचा एक प्रसंग याआधी देखील श्रीलंकेत पाह्यला मिळाला होता. मोदी श्रीलंका दौऱ्यावर गेले असताना राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी मोदींसाठी छत्री धरली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)

दरम्यान SCO Summit हे चीन चे नेतृत्व असलेला 8 दिवसीय आर्थिक आणि सुरक्षा कार्यक्रम आहे यामध्ये नरेंद्र मोदी व चीन चे राष्ट्रपती Xi जिनपिंग यांच्यासोबत भारत चीन संबंध सुधारण्यासाठी तसेच अनेक प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा घडल्याचे समजत आहे. या कार्यक्रमाच्या नंतर भारत चीन देशात सुरक्षा प्रश्नांसोबतच व्यापाराच्या संबंधात देखील सुधारणा होईल अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली होती.