इम्रान खान (Photo Credit : PTI)

किरगिझस्तानची (Kyrgyzstan) राजधानी बिश्केक (Bishkek) येथे शांघाय सहयोग संघटनेसाठी (SCO Summit) गेलेले, पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी इम्रान खान यांनी पुन्हा एकदा राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून, इम्रान खान यांना त्यांच्या वागण्याबद्दल ट्रोल केले जात आहे. काही लोकांनी इम्रान खान यांनी तमाम राष्ट्राध्यक्षांचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

या बैठकीदरम्यान तमाम देशांचे राष्ट्राध्यक्ष हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. जे लोक आधीच हॉलमध्ये उपस्थित आहेत ते नवीन येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी उभे राहिलेले दिसत आहेत. अशात हॉलमध्ये इम्रान खान, नरेंद्र मोदी प्रवेश करतात. इम्रान खान मोदींच्या पुढे चालत जाऊन आपल्या खुर्चीत स्थानापन्न होतात. मात्र त्यांना याचे भान राहत नाही की, या हॉललमध्ये आपण एकटेच बसलो आहोत बाकी सगळे उभे आहेत. इतक्यात पुतीन येत असल्याची घोषणा होते, त्यावेळी अगदी काही सेकंदासाठी इम्रान खान उभे राहतात मात्र पुन्हा ते बसतात.

अशाप्रकारे जिथे जगातील सर्व देशांचे प्रतिनिधी एकमेकांना आदर देताना उभे आहेत तिथे फक्त पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आरामात बसून असलेले दिसतात. दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीस इम्रान खान यांनी, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन्स (OIC) च्या 14 व्या शिखर संमेलनाला हजेरी लावली. साऊदी अरब येथे आयोजित केल्या गेलेल्याण्या साम्मेलानाताही त्यांनी राजकीय प्रोटोकॉल तोडला होता. इम्रान खानच्या अशा वागण्यामुळे सोशल मिडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.