Aung San Suu Kyi | (Photo Credits-Facebook)

म्यानमारमधील सत्तेवरून पायउतार झालेल्या नेत्या आंग सान सू की (Aung San Suu Kyi) या भ्रष्टाचार प्रकरणात (Corruption Case) दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे लोकशाही समर्थक असलेल्या या महिला नेत्याला आता पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. म्यानमारचे दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या आणि लोकशाही हक्कांसाठी नेहमीच अग्रेसगर असलेल्या आंग सान सू की या नोबेल (Nobel Prize) पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनी केलेल्या कामाची जगभरातून नोंद घेण्यात आली होती. मात्र, आता त्यांना 600,000 डॉलर रोख आणि सोने स्वरुपात लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे.

म्यानमारमध्ये सध्या लष्करी राजवट आहे. पदविहीन नेता आंग सान सू ची (Aung San Suu Kyi) यांना एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात हेलीकॉप्टर खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. क्योडो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जर या प्रकरणातही त्या दोषी आढळल्या तर त्यांना 100 वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा, Myanmar: म्यानमारमधील जनतेसाठी शनिवार ठरला रक्तरंजित दिवस; लष्कराने गेलेल्या गोळीबारात 114 लोकांचा मृत्यू, जगातील अनेक देशांनी केली निंदा)

क्योडो न्यूने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी निर्वाचित सरकारचे अध्यक्ष विन मिंट यांनी आंग सून सू ची यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. 1 फेब्रुवारी रोजी सत्तांदर झाल्यापासून म्यानमारमध्ये राजकीय चढउतार पाहायला मिळत आहेत. म्यानमारच्या लष्करातील एक वरिष्ठ नेते जनरल मिंग आंग यांनी आग सान सू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार हटवून तेथे आणिबाणी लागू केली. या काळात म्यानमारला अनेक हिंसक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.