धक्कादायक! मुस्लिम समाजाकडून पवित्र हज यात्रेवर बहिष्कार टाकण्याची मागणी; सौदीच्या राजावर जनतेचा रोष, जाणून घ्या काय आहे कारण
Muslim pilgrims are seen around the Kaaba at the Grand Mosque in Mecca, Saudi Arabia | File Pic | Photo Credit: IANS

सौदी अरबमधील (Saudi Arabia) सध्याची स्थिती पाहता, इस्लामच्या पवित्र तीर्थयात्रेवर हज यात्रेवर (Hajj) बहिष्कार (Boycott) टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही मागणी मुस्लिम समाजाकडूनच होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुस्लिम जनता सौदीच्या राजावर प्रचंड चिडलेले आहेत. ही गोष्ट थोडी धक्कादायक आहे, कारण सौदी अरबचे शासक प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Prince Mohammed bin Salman) यांनी ही हज यात्रा अजून सोपी म्हणून अनेक पावले उचलली आहेत. मात्र असे असूनही विरोधकांच्या नक्की मनात काय आहे? चला पाहूंया यामागील कारण

सौदी अरब मध्ये सध्या मोठा अंतर्गत कलह चालू आहे. प्रिन्स सलमान ज्या धोरणांवर आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला अनेक मुस्लिम आणि धार्मिक संघटनांचा विरोध आहे. हज यात्रेवर बहिष्कार टाकण्याची ठिणगी मागच्या वर्षी उडाली होती. पण मागच्या एप्रिल मध्ये जेव्हा लिबिया मधील सर्वात सुप्रसिद्ध सुन्नी मौलवी ग्रँड मुफ्ती सादिक अल-घरीआनी यांनी ही बहिष्काराची मागणी केली, तेव्हा संपूर्ण जगाला या गोष्टीची माहिती समजली. मौलवी यांनी केलेल्या अपीलमध्ये पुन्हा एकदा 'हज यात्रा केल्यावर इस्लाममध्ये पापांचा भागीदार बनणे' याचा उल्लेख केला गेला होता.

जगभरातून लाखो लोक दरवर्षी हजची यात्रा करतात. या यात्रेमधून सौदी अरबला मोठ्या प्रमाणात पैसा मिळत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे. मात्र हा पैसा दहशतवादाला पाठींबा देण्यासाठी वापरला जात आहे असा आरोप मुस्लिम लोकांकडून केला जात आहे. जेव्हा कधी इस्लाम बद्दल शिया-सुन्नी लोकांमध्ये मध्ये वादविवाद होतो, तेव्हा सौदी अरबकडेच अंतिम निर्णयासाठी पाहावे लागते. अशा प्रकारे सौदी अरब हा स्वत: ला इस्लामिक देशांचे नेतृत्व करणारा देश माणू लागला आहेत. त्यात हज यात्रेच्या पैशामुळे फोफावणाऱ्या दहशतवादाला मदल मिळत आहे असे आरोप होत आहेत. (हेही वाचा: मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय पवित्र आहे हज यात्रा; जाणून घ्या याचे महत्व आणि यात्रेदरम्यान केले जाणारे विधी)

या वेळी जगभरातील मुसलमानांनी प्रिन्स विरुद्ध एक सुरामध्ये आवाज उठविला आहे. या आवाजाचे नाव बनले आहे, #boycotthajj. ट्विटरवर हा हॅशटॅग चा वापर करून हज वरील बहिष्कारासाठी प्रचार केला जात आहे.