
ब्रिटिश-भारतीय (British-Indian) डॉक्टर भाषा मुखर्जी (Bhasha Mukherjee) ही मिस इंग्लड 2019 (Miss England) ची मानकरी ठरली आहे. आयुष्यातील करिअरची सुरुवात ज्युनिअर डॉक्टर पासून केलेल्या भाषाने हा मानाचा किताब मिळवला आहे. आता भाषा 69 व्या मिस वर्ल्ड च्या स्पर्धेत भाग घेणार आहे. यंदाचे मिस वर्ल्डचे पर्व लंडन येथे पार पडणार आहे.
अवघ्या नवव्या वर्षात आई-वडिलांसोबत भाषा ही भारतामधून लंडन येथे राहण्यास गेली. आता भाषा हिचे वय 23 असून तिने मिस इंग्लंडचा ताज मिळवला आहे. मात्र मिस इंग्लंडचा किताब मिळाल्यानंतर हिने काही वेळातच लिंकनशायर, बॉस्टन मधील पिलग्रिम हॉस्पिपटलमध्ये काम करण्यास सुरुवात सुद्धा केली.
भाषा हिने नॉटिंघम युनिव्हर्सिटी येथून मेडिसिन आणि सर्जरीमध्ये पदवी मिळवली आहे. त्याचसोबत ती अन्य पाच भाषांमध्ये निपुण आहे. भाषा हिचा मिस इंग्लंडसाठी लूक सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट जॉगी कांग यांनी केला होता. तसेच पुतीन ब्रांडाओ या ब्रांन्डचा रोजगोल्ड रंगाचा गाउन घातला होता. विजेत्याला 30 हजार पाउंड म्हणजेच 25 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले आहे. यामध्ये मॉरिशस येथील एक लक्झरी टूरसुद्धा विजेत्याला देण्यात आली आहे. (Miss World 2018: आज जगाला मिळणार नवी विश्व सुंदरी; Anukreethy Vas कडे भारतीयांचे लक्ष)
मुखर्जी हिला इंग्रजी आणि हिंदीसह बांग्ला, जर्मन आणि फ्रेंच भाषा बोलता येतात. तिचा IQ 146 असून ती बुद्धिमानसुद्धा असल्याचे खरे ठरेल आहे. मात्र मेडिकलचे शेवटचे वर्ष आणि मिस इंग्लंड स्पर्धा यांच्यामध्ये संतुलन राखणे फार कठीण होते.