आज रंगणार मिस वर्ल्ड 2018 ची स्पर्धा (Photo Credits: Instagram)

आज चीनच्या सान्या शहरात मिस वर्ल्ड (Miss World) स्पर्धा रंगणार आहे. यंदा हा किताब कोण पटकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी 4:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारताची अनुकृति वास (Anukreethy Vas) टॉप 30 मध्ये दाखल झाली आहे. भारताशिवाय नेपाळ, न्युझीलँड, सिंगापूर, चिली, फ्रान्स, बांग्लादेश, जपान, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको यांसारख्या भागातून अनेक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. गेल्या वर्षी भारताच्या मानुषी छिल्लर ने (Manushi Chillar) मिस वर्ल्डचा मान मिळवला होता. यंदा मिस वर्ल्ड स्पर्धेतील विजेतीला मानुषीच्या हस्ते हा ताज नव्या विश्व सुंदरीला घालण्यात येणार आहे.

रोमेडी नाऊ चॅनलवर हा स्पर्धेचे प्रसारण होणार आहे. त्याचबरोबर मिस वर्ल्ड 2018 च्या ऑफिशल युट्युब चॅनलवरही तुम्ही ही स्पर्धा पाहु शकाल.

जूनमध्ये तामिळनाडूच्या अनुकृति वासने मिस इंडियाचा किताब पटकावला होता. तर हरियाणाची मीनाक्षी चौधरी दुसऱ्या स्थानावर आणि आंध्रप्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानावर होती. अनुकृति मिस वर्ल्ड स्पर्धेत टॉप 30 मध्ये पोहचल्याने भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या असून संपूर्ण भारताचे लक्ष तिच्याकडे लागले आहे.