लंडन (London) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचा ताबा घेण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र सरकारकडे (Maharashtra Government) पत्रव्यवहार सुरू केला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहलं असून विदेशातील अभ्यासक आणि इतर संघटना आपण आंबेडकरवादी असल्याचं सांगून स्मारकाचा ताबा मागत आहे. केंद्राने लिहलेल्या पत्रामध्ये स्मारकाचं ऑटोनॉमस युनिट (Autonomous Unit) तयार करण्याबाबत उल्लेख केला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मध्ये राहून शिक्षण घेतलं. तेव्हाचं त्यांचं घर महाराष्ट्र सरकारने 2015 मध्ये विकत घेतलं. तेथे स्मारक उभारण्यात आलं. या स्मारकाची मालकी राज्य सरकारकडे आहे. सुमारे3.2 मिलियन पाऊंड्समध्ये हा व्यवहार झाला असून पंतप्रधान मोदींच्या हस्तेच त्याचं उद्घाटन देखील करण्यात आलं.
बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना 1921-22 मध्ये 10 किंग हेन्री मध्ये वास्तव्यास होते. ही वास्तू खाजगी होती नंतर भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने ती विकत घेतली. यामध्ये आता बाबासाहेबांचं वस्तूसंग्रहालय आणि स्मारक बनवण्यात आलं आहे.
संग्रहालयाच्या मुख्य मजल्यावर निवडक कृष्णधवल फोटोज आहेत, आंबेडकरांचे प्रसिद्ध कोट्स आहेत. एका खोलीमध्ये त्यांचे काही साहित्य आहे याशिवाय एका भिंतीवर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे मोठे चित्र आहे. राज्य सरकार भारतीय उच्चायुक्तांमार्फत संग्रहालयाच्या देखभालीवर दरवर्षी अंदाजे ₹1.5 कोटी खर्च करते. मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ मधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा .
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने केंद्राच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसादाचा मसुदा तयार केला आहे, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे पत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पाठवले जाईल.