Mahaparinirvan Din 2019: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बाबाहेबांच्या परळमधील निवासस्थानी पोहचले. परळमधील बीआयटी चाळीतील त्यांच्या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आज उद्धव ठाकरेंसोबत नाना पटोले आणि अन्य नेते, अधिकारी उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जडणघडणीच्या काळात म्हणजेच 1912 ते 1934 या कालावधीतील 22 वर्षे परळ येथील निवासस्थानी वास्तव्य होते.
बीआयटी चाळीचं स्मारकात रुपांतर करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल एका पत्राद्वारा उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. दरम्यान आज सकाळी उद्धव ठाकरे आज सकाळी शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. तेथे त्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.
महाराष्ट्र सरकारचे ट्वीट
डॉ.#बाबासाहेबआंबेडकर हे परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसर्या माळ्यावर राहायचे. २२ वर्षे येथे त्यांचे वास्तव्य होते. हे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी या चाळीला दिली भेट.#महापरिनिर्वाणदिवस pic.twitter.com/qIeNSUHjk7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2019
बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर मुंबईत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तर त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.