For representational purposes only (Picture Courtesy: Pexels)

ब्रिटनमध्ये (UK) लिंगाशिवाय (Penis) जन्म झालेल्या व्यक्तीला शस्त्रक्रिया करून लिंग बसवल्याची घटना घडली आहे. इंग्लंडमध्ये जन्म घेतलेल्या रोशांते (Roshaante) हा इंटरसेक्स (Intersex) होता. त्याचे अंडकोष उलटे होते आणि त्याला लिंग नव्हते. परंतु हळू हळू त्याच्यामध्ये पुरुषाचे गुण दिसू लागले. त्यामुळे त्याने आपल्या लैंगिक अवयवांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो त्याचे लैंगिक जीवन जगू शकेल. आता रोशांतने त्याच्या शस्त्रक्रियेबद्दल खुलासा केला असून, हे लिंग बसवण्यासाठी किती खर्च करावा लागला हेही सांगितले आहे.

रोशांतेने सांगितले की डॉक्टरांनी त्याच्या हाताच्या त्वचेपासून त्याचे लिंग बनवले. डॉक्टरांनी फॅलोप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. यासाठी हाताची चरबी, स्नायू, धमन्या, शिरा आणि त्वचेचा वापर केला गेला. हे लिंग बसवल्यानंतर ते एक किंवा दोन वर्षांपर्यंत वरच्या डोक्याशिवाय असते. जेव्हा ते शरीराशी सेट होते, तेव्हा डॉक्टर हे जननेंद्रिय लांब करतात आणि पुरुषाला लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम करण्यासाठी त्यात एक उपकरण घालतात. (हेही वाचा: पोलिस अधिकाऱ्यांनी ड्युटीवर असताना कारमध्ये केले Sex, लैंगिक क्रिया सुरु असल्यामुळे आपत्कालीन कॉलकडे केले दुर्लक्ष)

रोशांते या प्रक्रियेतून जावे लागले. आता त्याच्याकडे प्रायव्हेट पार्ट आहे ज्यामुळे तो सेक्स लाईफ एन्जॉय करू शकतो. मात्र, हे ऑपरेशन त्याला महागात पडले. रोशांत सांगतो की, त्याच्यावर पाच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता फक्त एक शस्त्रक्रिया बाकी आहे. मात्र यासाठी त्याला सुमारे 80 हजार पौंड (जवळपास 76 लाख) खर्च करावे लागतील. रोशांत एक मॉडेल आणि अभिनेता आहे.

रोशांतेने स्पष्ट केले की, जेव्हा तुम्हाला दोन जननेंद्रिय असतात किंवा एकही नसते तेव्हा त्यला इंटरसेक्स म्हटले जाते. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर, मला फक्त अंडकोष होते. जेव्हा मी 11 वर्षांचा होतो तेव्हा मला मी इंटरसेक्स असल्याचे समजले. परंतु वय वाढू लागले तसे मला समजले की मी एक पुरुष आहे. त्यानंतर मात्र मी शस्त्रक्रिया करून घेण्याचा विचार केला. इंटरसेक्स हा आजार नाही. प्रत्येक 2,000 लोकांपैकी एक व्यक्ती इंटरसेक्स आहे.