Sex In Car While On Duty: दोन विवाहित पोलीस अधिकार्यांनी ड्युटीवर असतांना कारमध्ये सेक्स (Sex) केले. सेक्स करतांना घरफोडी आणि हॉस्पिटलमधून आलेल्या कॉलला दुर्लक्षित केले. सार्जंट मॉली एडवर्ड्स (Sergeant Molly Edwards) आणि पीसी रिचर्ड पॅटन (PC Richard Paton) असे त्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या बॉसने त्यांचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. एका घरफोडीच्या घटने नंतर पोलिसांना जेव्हा फोन करण्यात आला होता तेव्हा “ओव, चला नग्न होऊ” असे ऐकू आले. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर ते पुढे बॉसला सांगण्यात आले होते. घटनास्थळापासून अवघ्या 25 मिनिटांच्या अंतरावर असूनही पोलिस अधिकारी घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकली नव्हते. [हे देखील वाचा: Sex Drive & Libido: तुमची कामवासना अर्थातच सेक्स करण्याची इच्छा कमी करू शकतात ही 7 औषधे; घ्या जाणून]
कामवासनेत मग्न असलेल्या जोडप्याने हॉस्पिटलमध्ये हजर राहण्यासाठी आलेल्या फोनला ही दुर्लक्षित केले. नाईटक्लबबाहेर झालेल्या गंभीर हल्ल्यातील दोन पीडितांना मदत करण्यासाठी 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोलिस अधिकारी गेले नाहीत. कारण ते सेक्स करण्यामध्ये मग्न होते.
पॅनेलचे अध्यक्ष जॉन बॅसेट यांनी निर्णय देतांना सांगितले की, काही गुप्त रेकॉर्डिंगमध्ये "सेक्स करत असतांनाचे काही वाक्य ऐकू आले आहेत" "रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे कपडे काढून टाकणे, चुंबन घेणे इत्यादीचे आवाज ऐकू आले. या घटनेनंतर दोघांनाही राजीनामा द्यावा लागला होता.
पॅनेलला असे आढळले होते की. 4 महिने या जोडप्याने “सार्वजनिक जागेत पोलिस वाहनात ड्युटीवर असताना लैंगिक संबंध प्रस्थापित केले ”
राजीनाम्यापूर्वी एका लेखी प्रतिसादात, एडवर्ड्सने लिहिले: "आम्ही एकत्र घालवलेल्या वेळेचा मला आनंद झाला, परंतु मला याची जाणीव झाली की आम्ही जे करत होतो ते चुकीचे आहे आणि आम्ही त्याला थांबवायला हवे."तिने सांगितले की लैंगिक क्रिया केवळ दोन वेळेस घडली होती.
तथापि, हे प्रकरण चार महिन्यांपासून सुरू होते हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा नसल्याचा निष्कर्ष पॅनेलने काढला, तरी किमान काही दिवसांपासून हा प्रकार घडत असल्याचे पॅनेलने सांगितले.
एडवर्ड्सने बचावात सांगितले की, पीडितांकडून फॉरेन्सिक पुरावे मिळवण्यासाठी रुग्णालयात हजेरी लावली नाही कारण आम्ही आधी नाईट क्लबमध्ये घटनास्थळी गेलो होते कारण क्रॉस-दूषित होण्याचा धोका होता.
आरोपी पोलिस अधिकारी दोघेही विवाहित आहेत आणि त्यांना मुले आहेत, त्यांनी कर्तव्यावर असताना पोलिस कारमध्ये लैंगिक संभोग केल्याचे नकारले परंतु नंतर लैंगिकसंबंध ठेवल्याचे कबूल केले.