
एक तासाच्या 'सेक्स मॅरेथॉन'दरम्यान (Sex Session) 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण केनियाची राजधानी नैरोबीचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या मैत्रिणीने त्याला आपल्या घरी बोलावले होते. रात्रीच्या जेवणानंतर ते दोघेही रोमँटिक क्षणांचा आनंद घेत असताना त्याचा मृत्यू झाला. डग्लस फंडी मुथुरी (Douglas Fundi Muthuri) असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, सेक्स दरम्यान बेशुद्ध पडण्यापूर्वी डग्लसला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अधिकारी घटनास्थळीवर पोहोचायच्या आतच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांना त्याच्या खिशात फ्युरोसेमाइड (उच्च रक्तदाबावरील औषध) आणि एक व्हायग्रा सापडले. नजीरू पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आणि नैरोबी न्यूजने पोलीस अहवालानुसार दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, मुथुरीची मंगेतर निसेरा वांगेचीने त्याला तिच्या घरी बोलावले होते. रात्रीचे जेवण घेतल्यानंतर ते सुमारे एक तास सेक्स करत राहिले आणि यादरम्यान मुथुरीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व काही वेळेनंतर तो बेशुद्ध पडला. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर जेव्हा त्याच्या कपड्यांची झडती घेण्यात आली तेव्हा, त्याच्या खिशात फ्युरोसेमाइडचे पॅकेट आणि एक निळी गोळी (व्हायग्रा) आढळली. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या शरीरावर कोणत्याही दृश्यमान जखमा नाहीत, परंतु त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सध्या त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नैरोबी न्यूजनुसार, देशात सेक्स करताना पुरुषांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. (हेही वाचा: 'मी अनेक पुरुषांशी Sex करून वाचवली आहेत त्यांची लग्ने', महिलेचा धक्कादायक खुलासा, जाणून घ्या सविस्तर)
दोन दिवसांपूर्वी मिगोरी येथील पोलिसांनी, 52 वर्षीय व्यक्तीच्या मृत्युप्रकरणी त्याच्या 24 वर्षीय प्रेयसीला ताब्यात घेतले होते. त्याचा मृतदेह एका हॉटेलवर सापडला होता. आपल्या प्रेयसीसोबत निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी या व्यक्तीने हॉटेल रूम बुक केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे देखील अस्पष्ट आहे.