LPG Tanker Explosion In Pakistan: पाकिस्तान (Pakistan) च्या पंजाब (Punjab) प्रांतात एलपीजी असलेल्या टँकरचा स्फोट (LPG Tanker Explosion) होऊन किमान सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुलतानच्या हमीद पुर कनोरा भागातील औद्योगिक वसाहतीत घडली. सोमवारी झालेल्या एलपीजी टँकरमध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठी आग लागली. स्फोटामुळे तुटलेल्या वाहनाचे ढिगारे जवळच्या निवासी भागात पडल्याने मोठे नुकसान झाले, असे जिओ न्यूजने वृत्त दिले आहे.
अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या आणि फोम-आधारित अग्निशमन दलाच्या मदतीने तासन्तास प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात आली, असे बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरुवातीला या प्राणघातक स्फोटात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. तथापि, स्फोटात नुकसान झालेल्या घरातून बचाव अधिकाऱ्यांनी आणखी एक मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची संख्या सहा झाली. (हेही वाचा - Gasoline Tanker Blast In Nigeria: नायजेरियात पेट्रोल टँकरशी झालेल्या धडकेनंतर भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू)
मृतांमध्ये एक अल्पवयीन मुलगी आणि दोन महिलांचा समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळा भोवतालची किमान 20 घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तर 70 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. मुलतानचे शहर पोलिस अधिकारी (सीपीओ) सादिक अली यांनी जिओ न्यूजला सांगितले की, आगीत अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. (हेही वाचा -Pandharpur Bus Accident: पंढरपूर च्या भटुंबरे मध्ये विठू माऊलीच्या भाविकांच्या बसचा अपघात; ट्रक च्या धडकेत दोघांचा मृत्यू, 23 जखमी)
औद्योगिक वसाहतीत उभ्या असलेल्या टँकर ट्रकच्या एका व्हॉल्व्हमधून गॅस गळती होत होती. टँकरचा स्फोट होण्यापूर्वीच गॅसचा वास आल्यानंतर परिसरातील काही लोकांना आधीच बाहेर काढण्यात आले होते. जखमींपैकी १३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.