Gasoline Tanker Blast In Nigeria: दक्षिण नायजेरियात (Southern Nigeria) पेट्रोल टँकरचा स्फोट (Gasoline Tanker Blast) होऊन किमान 18 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले आहे की, आग्नेय राज्यातील एनुगुमधील एनुगु-ओनित्शा एक्सप्रेसवेवर पेट्रोल वाहून नेणाऱ्या एका टँकरने नियंत्रण गमावले आणि 17 वाहनांना धडक दिली. त्यानंतर टँकरला भीषण आग लागली.
सुरक्षा दलाच्या बचाव पथकाचे प्रवक्ते ओलुसेगुन ओगुंगबेमिडे यांनी सांगितले की, या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. यातील अनेकजण आगीमुळे जळून खाक झाले होते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 10 जखमींव्यतिरिक्त, बचाव कर्मचाऱ्यांनी इतर तिघांना सुरक्षित ठिकाणी नेले. नायजेरियातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर जीवघेणे ट्रक अपघात सामान्य झाले आहेत. (हेही वाचा -Pandharpur Bus Accident: पंढरपूर च्या भटुंबरे मध्ये विठू माऊलीच्या भाविकांच्या बसचा अपघात; ट्रक च्या धडकेत दोघांचा मृत्यू, 23 जखमी)
पेट्रोल टँकरच्या स्फोटात 98 लोकांचा मृत्यू -
या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर-मध्य नायजेरियातील नायजर राज्यातील सुलेजा परिसरात असाच एक स्फोट झाला होता. जिथे पेट्रोल टँकरच्या स्फोटात 98 लोकांचा मृत्यू झाला होता. एका टाकीतून दुसऱ्या टाकीत पेट्रोल भरत असताना हा अपघात झाला. त्यावेळी पेट्रोल काढण्यासाठी अनेक कामगार आणि इतर लोक घटनास्थळी उपस्थित होते. त्यावेळी हा स्फोट झाला. (हेही वाचा - Karnataka Accident: कर्नाटकात कंटेनर ट्रक कारवर उलटल्याने सहा जणांचा मृत्यू)
या अपघातात 56 जण जखमी झाले होते. तसेच 15 हून अधिक दुकाने उद्ध्वस्त झाली होती, असे राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने एका निवेदनात सांगितले होते. रॉयटर्सच्या एका साक्षीदाराने सांगितले की, शनिवारी रात्री इस्लामिक रितीरिवाजांनुसार पीडितांना दफन करण्यासाठी रहिवासी आणि अधिकारी कबरी खोदत होते. नायजर राज्याचे फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्स सेक्टर कमांडर कुमार त्सुकवाम यांनी सांगितले की, बहुतेक बळी गरीब स्थानिक रहिवासी होते, जे ट्रक उलटल्यानंतर सांडलेले पेट्रोल गोळा करण्यासाठी धावले होते.