Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव प्रकरणी इस्लामाबद कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली, भारताने म्हटले सर्व कायदेशीर मार्ग वापरु
Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी वकिल देण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने (Islamabad High Court) या प्रकरणाची सुनावणी 6 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणावर पाकिस्तानच्या कायदा मंत्रालयाने दाखल केलेल्या अपीलवर इस्लामाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणी वेळी भारत सरकारने वकील नियुक्त करण्याची मागणी केली.

या आधीच्या सुनावणीत न्यायालयाने पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा भारतीय उच्चायोग द्वारा वकील नियुक्ती प्रस्ताव देण्यासाठी सांगण्यात आले होते. दरम्यान, भारतान कोणत्याही पाकिस्तानी वकिलाला न्यायालयात पाठवले नाही.

दरम्यान, पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटले आहे की, भारतीय पक्ष जाधव यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय वकील देण्याबाबत मागणी करत आहे. ही मागणी असंमत आहे. जाहिद हफीज यांनी म्हटले आहे की, आम्ही वारंवार त्यांना हे सांगितले आहे की, केवळ वकीलच न्यायालयात बाजू मांडू शकतात. हे वकिलच जाधव यांचे प्रतिनिधीत्व करु शकतात. ज्यांच्याकडे पाकिस्तानी न्यायालयात बाजू मांडण्याचा परवाना आहे. (हेही वाचा, Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानचा पुन्हा एकदा कॉन्सुलर एक्सेसचा दावा, भारताने म्हटले कोणतीही माहिती नाही)

पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालय प्रवक्ताच्या म्हणण्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, आम्ही कुटनितीक पद्धतीने पाकिस्तानच्या संपर्कात आहोत. कुलभूषण जाधव यांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी सर्व ते कायदेशीर मार्ग आणि पर्याय आम्ही वापरु, असे भारताने म्हटले आहे.