Donald Trump And Narendra Modi (Photo Credits: Instagram)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump0  यांनी काश्मीर (Kashmir) मुद्द्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता अमेरिकेने (America) बचावात्मक पवित्रा स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. काल, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची भेट घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी आपल्याकडे काश्मीरच्या मुद्द्यामध्ये मध्यस्थी करून मदत करण्याची विनंती केल्याचे म्हंटले होते, ज्यावर भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार (Raveesh Kumar) यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून या विधानात काहीच तथ्य नसल्याचे म्हंटले होते, मात्र या विधानामुळे भारताने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जोरदार निषेध नोंदवला. ही बाब लक्षात घेता आता अमेरिकेकडून ट्रम्प यांच्या विधानाचे आपण समर्थन करत नसल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील काश्मीरचा प्रश्न हा पूर्णतः द्विपक्षीय आहे त्यात अमेरिका किंवा इतर कोणत्या तृतीय पक्षाने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इंडिया टुडे च्या वृत्तानुसार, या प्रकरणात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा ट्रम्प यांच्या विधानाला फोल सांगितले आहे, तसेच ब्रॅड शेरमॅन यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून आपण या विधानासाठी भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्ष श्रींगला यांची माफी मागितल्याचे म्हंटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटारडेपणा जगासमोर; काश्मीर मुद्द्यावरील दावा भारताने फेटाळला, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ब्रॅड शेरमॅन ट्विट

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्ष काश्मीरचा प्रश्न सुटला नसला तरी यापूर्वी कधीही भारताने आंतराष्ट्रीय स्तरावर मदत मागितल्याचे पूरावे नाहीत, उलट, हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशात आपापसात चर्चा हा तोडगा असल्याचे भारताकडून म्हंटले जात होते, मात्र असे असतानाही ट्रम्प यांनी केलेल्या या खोट्या दाव्यानंतर दोन्ही आंतराष्ट्रीय राजकारणात बराच गदारोळ आणि निषेध झाला होता, त्यात आता स्वतः अमेरिकेच्या मंत्रालयानेच ट्रम्प यांचा दावा खोटा सांगत त्यांना जगासमोर चुकीचे सिद्ध केले आहे.