 
                                                                 आपल्या 5 मुलांची हत्या करणाऱ्या एका नराधमाला अमेरिकेत (America) फाशीची (Death) शिक्षा सुनावण्यात आली आहे. टिमोथी जोन्स (Timothy Jones) असे या व्यक्तीचे नाव असून तो 37 वर्षांचा आहे. 2014 साली त्याने आपल्या 1 ते 8 वयोगटातील 5 मुलांची हत्या केली होती त्यानंतर त्यांच्या मृतदेहांसह तो विविध शहरात फिरला होता. अखेरीस अलबामा राज्यात कचरा कुंडीत हे मृतदेह टाकताना त्याला पकडण्यात आले. मात्र त्याच्या पत्नीने त्याची शिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साऊथ कॅरोलिना (South Carolina) प्रांतातील टिमोशी हा संगणक अभियंता आहे. आपला सहा वर्षांचा मुलगा आपल्या हत्येचा कट करत आहे असे समजून त्याने प्रथम या मुलाला मारले. त्यानंतर उर्वरीत 4 मुलांची हत्या केली. त्यानंतर त्या चिमुरड्यांचे मृतदेह घेऊन तो 9 दिवस विविध शहरांत फिरत राहिला. अखेर अलबामा येथे या मृतदेहांची विल्हेवाट लावत असताना, सिग्नलवर पोलिसांना त्याच्या गाडीतून विचीत्र वास आला. त्यानंतर गाडीची संपुर्ण तपासणी केली असता, हे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक करून चौकशी सुरु केली.
(हेही वाचा: गतिमंद-सावत्र मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
दरम्यान जोन्सची पूर्व पत्नी अँबर केजरने त्याची ही शिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी कोर्टात केली. ‘त्याच्या मुलांचे जोन्सवर फार प्रेम होते, त्याला जगण्याची एक संधी द्यावी. ही मागणी आपण आपल्या मुलाच्यावतीने करीत आहोत’ असे तिने कोर्टाला सांगितले. मात्र न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली. सुनावणी दरम्यान आपण 'स्किझोफ्रेनिया' या मानसिक रोगाने त्रस्त असल्यामुळे आपल्या विरोधात खटला चालऊ नये, असा युक्तिवाद या पित्याने केला होता.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
