Johnson & Johnson coronavirus vaccine trials । File Image

जगभरात मागील 6-7 महिन्यांत कोरोना व्हायरसने अनेक स्तरांवर नुकसान केले आहे. सध्या कोविड 19 सोबत जगायला शिकणार्‍या जगाला पुन्हा मोकळा श्वास घेता यावा याकरिता संशोधक, वैज्ञानिक लस, औषधं उपलबध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र ही लस बाजारात उपलब्ध करण्यापूर्वी ती सुरक्षित असावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील Johnson & Johnson कंपनीच्या कोरोना व्हायरस वरील संभाव्य लसीचे सुरूवातीच्या चाचणींचे परिणाम सकारात्मक मिळाले असले तरीही आता काही स्वयंसेवकांना त्रास होत असल्याने लसीच्या चाचण्या थांबावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या लसीचे प्रतिकूल परिणाम रूग्णांवर आढळले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. COVID-19 Vaccine Update: Johnson & Johnson कंपनीच्या कोविड-19 वरील संभाव्य लसीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक.

दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची कोरोना व्हायरस वरील लस वैद्यकीय चाचणी शेवटच्या टप्प्यात पोहचली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. Ad26.COV2.S च्या एकाच डोसमुळे लस दिलेल्यांपैकी बहुतांश स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक परिणाम दिसत होते. सध्या जगभरात सुमारे 60 हजार लोकांवर त्याची चाचणी सुरू होती मात्र अचानक काहींना त्रास होत असल्याची माहिती आता वृत्तसंस्थेद्वारा पुढे आली आहे.

ANI Tweet

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या संभाव्य कोरोना चाचणीचा सध्या अंतिम टप्पा सुरू आहे. अमेरिकेमध्ये यासोबतच अन्य 3 लसींच्यादेखील चाचण्या सुरू असून त्यांचे परिणामही लवकरच जाहीर केले जातील 2020 च्या वर्ष अखेरीपर्यंत कोरोनावर प्रभावी लस उपलब्ध होऊ शकते असा विश्वास आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी प्रमाणेच यापूर्वीच युके मध्ये अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या चाचण्या देखील थांबवण्यात आल्या होत्या. एका व्हॉलेंटिअरची प्रकृती खालावल्याने जगभरातील चाचण्या थांबवल्या होत्या. मात्र नंतर काही दिवसातच त्या पुन्हा सुरू देखील करण्यात यश आलं आहे.