jamal khashoggi | (Photo courtesy: archived, edited images)

Jamal Khashoggi murder Case: अमेरिकेतील द वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकासाठी लिहिणारे सौदीचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती देणारे एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. तुर्कीच्या एका चॅनलने हे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले आहे. हे फुटेच प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक पाच सूटकेस आणि दोन काळ्या बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. या चॅनलचा दावा आहे की, या बॅगमध्ये पत्रकार खशोगी यांच्या मृतदेहाचे तुकडे होते. 8 ऑक्टोबर 2018 या दिवशी पत्रकार खशोगी यांची हत्या करण्यात आली होती.

सी टेलिव्हिजिन नावाच्या चॅनलने रविवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळी दिलेल्या वृत्तात हे सीसीटीव्ही फुटेज दाखवले आहे. या वृत्ता प्रसिद्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या संशयीत तीन व्यक्ती पाच सुटकेस आणि सौदीच्या वाणिज्य-दूत जनरल यांच्या घरात घेऊन जाताना दिसत आहे. (हेही वाचा, हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सौदीच्या क्राऊन प्रिन्स यांचा संवाद; विविध मुद्द्यांवर चर्चा )

वृत्तसंस्था एपीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, सौदी वाणिज्य दूतावासापासून हे घर काहीच अंतरावर आहे. जिथे पत्रकार खशोगी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाची आंतरराष्ट्री पातळीवरही जोरदार पडसाद उमटले. जगभरातील प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लाऊन धरले आहे.ए हैबर नावाच्या एका चॅनलने कोणाचेही नाव न घेता तुर्की सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, खशोगी यांच्या शरीराचे तुकडे सूटकेस आणि बॅगमध्ये भरले होते.