G20 Summit 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सौदीच्या क्राऊन प्रिन्स यांचा संवाद; विविध मुद्द्यांवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैदिचे क्राऊन प्रिन्स यांच्याशी चर्चा करताना ((Photo Credits: Twitter, @MEAIndia))

G20 Summit 2018 in Argentina: G20 शिखर परिषद (G20 Summit)अर्जेंटीना (Argentina) येथे पार पडत आहे. या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia)अहद (क्राऊन प्रिन्स) मोहम्मद बिन सलमान (Crown Prince Mohammed bin Salman) यांच्यासोबत आज (गुरुवार, 30 नोव्हेंबर) संवाद साधला. उभय नेत्यांमध्ये आर्थिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांना चालना देण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी अन्नसुरक्षा (Food Security), अक्षय उर्जा (Renewable energy), तंत्रज्ञान (Technicalization)आदी क्षेत्रांना चालना देण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान मोदींना ट्विट करुन या चर्चेबाबत माहिती दिली.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, 'क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांच्याशी चर्चा झाली. आम्ही भारत आणि सौदी अरब यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठीच्या अनेक पैलूंवर चर्चा केली. यात आर्थिक, सामाजिक, सांस्कृती आणि तंत्रज्ञान आदी मुद्द्यांचा समावेश होता.' दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार (Ravish Kumar)यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'राजनैतीक संबंधाना दृढ बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरबच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत अर्जेंटीनामध्ये सुरु असलेल्या G-20 शिखर परिषदेत चर्चा केली. यात आर्थिक, समाजिक, सास्कृतिक, पेट्रोलियम, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा यांसह इतरही अनेक मुद्द्यांचा समावेश होता.' (हेही वाचा, जर्मनी-फ्रान्स एकत्र आले, मग भारत-पाकिस्तान का नाही? इम्रान खान)

पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये सौदी अरब गणराज्य हे एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. या संबंधांचा विस्तार भारतीय समूहाची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि इतरही अनेक क्षेत्रासाठी फायदेशीर ठरला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस (United Nations General Secretary Antonio Guterres) यंच्याशीही संवाद साधला.