पाकिस्तान माजी पंतप्रधान इम्रान खान (फोटो सौजन्य- ANI)

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या हस्ते कतारपूर (Kartarpur)कॉरिडोरचे भूमीपूजन झाले. त्यावेळी इम्रान यांनी फ्रान्स- जर्मनी (France-Germany) एकत्र आले, तर भारत- पाकिस्तान (India-Pakistan) का नाही? असे विधान या भूमीपूजनावेळी त्यांनी केले आहे.

शीख समुदायाकडून बऱ्याच काळापासून पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा नानक शाहपासून ते करतापूरपर्यंत कॉरिडोर बांधण्याची मागणी वारंवार केली जात होती. या प्रकरणी भारत आणि पाकिस्तानच्या सरकारने त्यांची मागणी पूर्ण करत हा कॉरिडोर बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सरकारने या प्रकरणी मान्यता दिली आहे. त्यामुळेच आज इम्रान खान यांच्या हस्ते भूमीपूजनाचा सोहळा पार पडला आहे. तर पाकिस्तानमध्ये कतारपूर साहिब हे प्रार्थनास्थळ रावी नदीपलिकडील डेरा बाबा नानक यांच्यापासून केवळ 4 किमी अंतरावर आहे. शिख गुरूंनी 1522 मध्ये या गुरूद्वाराची स्थापना केली होती.

या भूमीपूजनावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू यांनी हिंदू जीवे, पाकिस्तान जीवे अशा घोषणा केल्या आहेत.या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल याही उपस्थित होत्या. आज शीख धर्मीयांसाठी हा ऐतिहासिक दिवस होता असल्याचे केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितले आहे.