इस्त्राईल: मध्यावधी निवडणूक प्रचारात बेंजामिन नेत्यानाहू यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर
Prime Minister Benjamin Netanyahu and PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter)

Israeli legislative Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा चेहरा वापरत भाजपने लोकसभा निवडणूक 2014 प्रमाणेच लोकसभा निवडणूक 2019 प्रचंड बहुमताने जिंकली. पण, पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरुन केवळ भारतातील राजकारणीच नव्हे तर विदेशातील राजकारणीही निवडणुका जिंकण्याचा विचार करत आहेत. कदाचित अनेकांना आश्चर्य वाटले असेल पण, इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू (Benjamin Netanyahu) हे मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा वापर करत असल्याचे पुढे आले आहे.

इस्त्राईल देशात मध्यावधी निवडणुकीचे वारे वाहात आहे. येत्या 17 सप्टेंबर रोजी इथे मतदान होत आहे. त्यामुळे या देशातील राजकारणी आपापल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचत आहेत. तसेच, प्रचारासाठी हटके शक्कलही वापरत आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी तर थेट इतर देशांच्या पंतप्रधानांच्या प्रतिमा वापरतच प्रचार केला आहे. मते मागण्यासाठी ते चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचाही वापर करत आहेत. आपल्या प्रचारासाठी नेत्यनाहू यांनी मोठमोठी होर्डिंग्ज वापरली आहेत. ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, डोनाल्ट ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्श व्लादिमीर पुतिन यांची छायाचित्रं वापरली आहेत.

बेंजामिन नेत्यानाहू ट्विट

इतर देशांच्या पंतप्रधानांच्या प्रतिमा होर्डिंग्जवर वापरुन बेंजामिन नेत्यन्याहू हे देशातील जनतेला संदेश देऊ इच्छितात की, जगभरातील नेते आपल्यासोबत आहेत. दरम्यान, इस्त्राईलमध्ये अलिकडेच निवडणुका (9 एप्रिल) झाल्या होत्या. त्यात बेंजामिन नेत्यनाहू हे सलग पाचव्यांदा घवघवीत यश मिळवत सत्तेत आले. मात्र, पाचव्यांदा सत्तेत आलेल्या नेत्यनाहू यांना सैन्याच्या एका विधेकावर मित्रपक्षांची साथ मिळाली नाही. परिणामी नेत्यनाहू सरकार कोसळले. त्यामुळे इस्त्राईलमध्ये सध्या मध्यावधी निवडणुका लागल्या आहेत. ज्याचे येत्या 17 सप्टेंबरला मतदान आहे. (हेही वाचा, Priti Patel बनल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या पहिल्या गृहमंत्री)

ट्विट

निवडणुका जिंकण्याचे तंत्र मोठ्या खुबीने आत्मसात केलेल्या भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये बाजी मारत दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या या विजयाचे किंगमेकर ठरले. 2014 आणि 2019 मध्ये मिळालेल्या प्रचंड विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भारतात जनमानसातील नेते तसेच निवडणुका जिंकण्यासाठी वलयांकीत चेहरा अशी ठरली. नेत्यानाहू यांनीही आता पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा वापरली आहे. पाहूयात आता इस्त्राईलमध्ये काय होतंय.